विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा शासकीय हेलिकॉप्टरमध्ये शनिवारी पाली येथून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच तांत्रिक बिघाड झाला. दुपारी 4:03 वाजता गर्ल्स कॉलेजच्या हेलिपॅडवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 25-30 फूट उंच गेल्यावर हेलिकॉप्टरमधून धूर निघू लागला आणि मोठा आवाज झाला. त्वरित सावधगिरी बाळगत पायलटने आपत्कालीन लँडिंग करत मोठा अपघात टाळला.
या घटनेच्या वेळी राज्यपाल बागडे हेलिकॉप्टरमध्ये नव्हते. ते आधीच रस्त्याने सोनाणा खेतलाजी येथील एका कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यांना सोडल्यानंतर हेलिकॉप्टर जयपूरला परत जात असताना हा प्रकार घडला. प्रत्यक्षदर्शींनी हेलिकॉप्टरमधून धूर निघताना पाहिल्याचे सांगितले असून, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे व्हीआयपी हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर अग्निशमन दल आणि आपत्कालीन वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली. खबरदारी म्हणून हेलिकॉप्टर ताडपत्रीने झाकण्यात आले आणि इंजिनची तपासणी करण्यासाठी तांत्रिक चमूला पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणीत तांत्रिक बिघाड झाल्याचे संकेत मिळत असून, याबाबत अधिकृत चौकशी सुरू आहे.
या प्रसंगानंतरही राज्यपाल बागडे यांनी आपला नियोजित दौरा सुरू ठेवला. त्यांनी रात्री रणकपूर येथे मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी उदयपूरला रवाना झाले. या घटनेनंतर सरकारी विमानांसाठी असलेल्या सुरक्षाविषयक नियमांची पुनर्रचना करण्याची मागणी केली जात आहे.
हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बिघाडामागील नेमके कारण जाणून घेण्यासाठी तज्ञ तपास करत आहेत.
Rajasthan Governor haribhau bagde helicopter suffers technical fault
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची