विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपट मोबदल्यात राजेंद्र पाटील यड्रावकरांनी फसवणूक केली आहे. स्वत:च्या फायद्यासाठी महापुराचा विचार न करता रेखांकन बदलल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमदार यड्रावकर यांच्यावर केला आहे. Raju Shetty
शेट्टी मांडले, यड्रावकरांनीसुरवातीस रेखांकन बदलून घेऊन जैनापूर गावास बायपास दाखवित स्वत:च्या कॅालेज जवळून पुढे कोथळी व उमळवाड लक्ष्मीनगर जवळून मार्ग काढला होता. यानंतर १४/१/२०२२ रोजीच्या नवीन कायद्याप्रमाणे दुप्पट नुकसान भरपाई मिळणार हे लक्षात आल्यावर ११ जानेवारी २०२२ रोजी जैनापूर गावास बायपास करण्यात आलेले रेखांकन पुन्हा बदलून पुर्वीप्रमाणे केले व उदगांव, उमळवाड येथील शेतक-यांचे रेखांकन कायम ठेवून परिसरातील उमळवाड , उदगांव , कोथळी , सांगली शहर , धामणी , समडोळी कवठेपिराण , सांगलवाडी , हरिपूर , दानोळी , कवठेसार , हिंगणगांव , कुंभोज दुधगांव सावळवाडी माळवाडी ,किणी ते खोची या भागातील शेतक-यांचे मोठे नुकसान केले आहे. Raju Shetty
स्वत:चा फायदा बघणा-या यड्रावकर यांना जर खरच शेतक-यांची काळजी होती तर रेखांकन , प्रकल्प अहवाल , निविदा प्रक्रिया व चार गावातील मोजण्या पुर्ण होईपर्यंत मुग गिळून का गप्प बसले होते याचे उत्तर द्यावे.
रत्नागिरी – नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक या मार्गातील जमीनींना चौपट मोबदला मिळावा या मागणीसाठी गेल्या दिड वर्षापासून शेतकरी लढा देत आहेत.काल झालेले आंदोलन हे राजकीय असल्याची प्रतिक्रिया शिरोळ विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी देवून स्वत:चे अपयश लपविण्यासाठी ११ गावातील शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला असल्याचे राजू शेट्टी यांनी दिली.
काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने अंकली टोल नाका येथे चौपट मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. काल रात्रीपासूनच स्वाभिमानीच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तरीही परिसरातील शेतकरी व महिला यांचेवतीने रास्ता रोको करण्यात आले.
या आंदोलनाबाबत शिरोळ विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले कि आम्ही शेतक-यांच्या बाजूने आहोत. या महामार्गात माझीही जमीन जात असल्याने आम्ही विरोध करत आहोत. आजपर्यंत राष्ट्रीय महामार्गाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. आठ दिवसापुर्वी मुख्यमंत्री यांना भेटून तोडगा काढण्याचे निवेदन दिले असल्याचे सांगितले.
याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले कि वास्तिवक पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रेखांकन करून , प्रकल्प अहवाल तयार करून, रस्त्याची निवीदा प्रक्रिया करण्यात आली आहे. अतिग्रे , चोकाक , हातकंणगले , माणगावेवाडी या गावांची मोजणी पुर्ण करण्यात आली आहे. सोमवार व मंगळवारी उदगांव व उमळवाड गावातील जमीनी मोजणी करण्याची नोटीसा शेतक-यांना देण्यात आले आहेत. यामुळे संतप्त होवून शेतकरी उपोषणास बसले आहेत. जर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मोजणी पुर्ण झाली तर १९५६ च्या भुसंपादन कायद्यानुसार सक्तीने भुसंपादन करून महामार्गाच्या कामास सुरवात होणार आहे. यामुळे परिसरातील शेतक-यांनी या मोजणीस विरोध करत आजचे आंदोलन केले आहे.
Raju Shetty accuses MLA Yadravkar of fraud in four times payment for the National Highway
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!