विशेष प्रतिनिधी
अयोध्या : Ram temple कोट्यावधी भारतीयांचे श्रद्धास्थान आणि स्वप्न असलेले अयोध्येतील राम मंदिराचे पूर्ण बांधकाम येत्या ५ जून २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. मंदिराच्या एकूण कामात ९९ टक्के प्रगती झाली असून केवळ अंतिम टप्प्यातील काही धार्मिक विधी बाकी आहेत, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले.Ram temple
मिश्र म्हणाले की, “रामलल्ला विराजमान असलेले गाभाऱ्याचे बांधकाम आधीच पूर्ण झाले आहे. पहिला आणि दुसरा मजला, तसेच मंदिराचे शिखर यांचे काम अंतिम टप्प्यात होते. आज मंदिराच्या शिखरावर ध्वजदंड बसवण्यात आला असून, यामुळे शिखराचे कामही पूर्ण झाले आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या राम दरबारामध्ये प्रभू श्रीराम, सीता माता आणि हनुमानजींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना २३ मे रोजी होणार आहे. त्या दिवशी या मूर्ती अयोध्येत आणल्या जातील आणि त्यांच्या पूजास्थळी स्थापण्यात येतील. त्यानंतर काही धार्मिक विधी होतील.”
या पार्श्वभूमीवर ५ जून रोजी श्रीरामाची विधिवत प्रतिष्ठापना होणार असून, संपूर्ण मंदिर भक्तांसाठी खुले होईल. “हा क्षण भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि ऐतिहासिक ठरणार आहे,” असे मिश्र यांनी सांगितले.
नृपेंद्र मिश्र म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष सूचनेनुसार रामायणातील प्रमुख ऋषी व भक्तांसाठी जी सात मंदिरे बांधण्यात येत होती, ती देखील आता पूर्ण झाली आहेत. यामध्ये महर्षी वाल्मिकी, श्री वसिष्ठ, विश्वामित्र, अहिल्या माता, निषादराज, शबरी माता आणि अगस्त्य मुनि यांची मंदिरे समाविष्ट आहेत.ही मंदिरे मंदिर परिसरातच असून तीही ५ जूननंतर जनतेसाठी खुली करण्यात येणार आहेत. याच दिवशी मंदिराच्या पारकोटाभोवती बांधण्यात आलेल्या सहा मंदिरांतील पूजाविधी देखील पार पडणार आहेत. चंपत राय हे ५ जूनच्या सर्व विधींसाठी संपूर्ण कार्यक्रम लवकरच जाहीर करतील.
मंदिर पूर्ण होण्याआधीच दररोज ७५ हजार ते १ लाखांपर्यंत भाविक दर्शनासाठी येत आहेत. ही भक्तांची श्रद्धा आणि निष्ठा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. पाच जूननंतर मंदिर परिसरातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुले होतील आणि एक-दोन दिवसांत सर्व व्यवस्था सुरळीत केल्यानंतर भाविकांना पूर्ण परिसराचे दर्शन घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.
Ram temple construction will be completed by June 5, says Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Samiti Chairman Nripendra Mishra
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती