विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ Chhawa चित्रपटामुळेच नागपूरला दंगल झाली. या चित्रपटावर बंदी घालावी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ऑल इंडिया मुस्लीम जमातचे अध्यक्ष मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी केली आहे.
‘छावा’ चित्रपटामुळे चित्रपटामुळे तरूणांची माथी भडकवली जात असून दंगली उसळत आहेत. नागपुरातील दंगलीला ‘छावा’ चित्रपट जबाबदार आहे. त्यामुळे चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी ऑल इंडिया मुस्लीम जमातचे अध्यक्ष मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात मौलाना रझवी यांनी गृहमंत्री शहा यांना पत्र लिहिले आहे.
मौलाना रझवी यांनी म्हटले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबाचे चित्रण ज्यापद्धतीनं करण्यात आले, त्यावरून तरूणांची माथी भडकवली जात आहेत. त्यामुळे अशांतता निर्माण होत आहे.”
“नागपूरमध्ये दंगल उसळण्यास ‘छावा’ चित्रपट कारणीभूत आहे. भारतातील मुस्लीम औरंगजेबाला आपला आदर्श किंवा नेता मानत नाही. आम्ही त्याला फक्त मुघल शासक मानतो. त्यापेक्षा अधिक काही नाही. तसेच, नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी आवाहन केले होते. त्या परिसरात उलेमा आणि इमाम यांना संपर्क साधून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला,” असे मौलान रझवी यांनी म्हटले आहे.
क्रिकेटपटू मोहम्मद शमीने रमझानमध्ये रोजा न ठेवल्यावरून आणि शमीच्या मुलीने रंगपंचमी खेळल्याबद्दलही तिच्यावर टीका केल्याने यासंदर्भात मौलाना रझवी चर्चेत आले होते.
Riots in Nagpur due to the movie ‘Chhawa’, Maulanas demand Home Minister Amit Shah to ban it
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार