विशेष प्रतिनिधी
कोक्राझार : आसामच्या शेकडो तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. त्यांनी शस्त्रे खाली टाकण्यात आली आहेत. गेल्या तीन वर्षात आसाम मधील नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँडच्या 4,881 सदस्यांच्या पुनर्वसनासाठी आजवर 287 कोटी रुपये खर्च करण्यात आला असून, यातील 90 टक्के रक्कम ही मोदी सरकारने दिली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.
आसामच्या कोक्राझार येथे ऑल बोडो स्टुडंट्स युनियन (एबीएसयु) च्या 57 व्या वार्षिक परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ऑल बोडो स्टुडंट्स युनियनच्या भूमिकेशिवाय बोडो करार शक्य झाला नसता आणि बोडोलँड मध्ये शांतता प्रस्थापित झाली नसती, असे गौरवोद्गार शहा यांनी काढले. यावेळी शाह यांनी बोडोलँडच्या शांततेसाठी लढणाऱ्या 5 हजार हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
बोडोलँडचे नेते उपेंद्रनाथ ब्रह्माजी यांनी दाखवलेल्या मार्गावर सगळा बोडोलँड मार्गस्थ आहे, आणि म्हणूनच केंद्र सरकारने दिल्लीतील एका प्रमुख रस्त्याचे नाव बोडोपा उपेंद्रनाथ ब्रम्हा मार्ग असे ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये उपेंद्रनाथ ब्रह्माजींच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती देखील शाह यांनी दिली.
आसाम कमांडो बटालियनमध्ये 400 बोडो तरुणांची भरती करून आसामचे मुख्यमंत्री डॉ. सर्मा यांनी एक नवी सुरुवात केली आहे, असे देखील शाह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आसाम मधील एकूण नऊ बंडखोर गटांशी करार केले असून, ज्यामुळे 10 हजारहून अधिक तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यश आले आहे, अशी माहिती गृहमंत्री शाह यांनी दिली.
Rs 287 crore spent for rehabilitation of Bodoland members, Amit Shah informs
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!