विशेष प्रतिनिधी
मुंबई: उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना कोणी सोडून जात असेल. कोणी पक्षातून फुटत असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशजच असतील, निर्घृण-अमानुष असतील, असा संताप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटातील खासदारांना ‘बाप आणि लेकीला सोडून दादांसोबत चला’ असा सल्ला दिला होता.
यावर हल्ला चढविताना राऊत म्हणाले , अजित पवारांपासून ते सुनील तटकरे, प्रफुल पटेल या सगळ्यांना आज जे काही मिळालं ते शरद पवार यांच्यामुळे मिळालं. त्यांची आजा बाजारात जी किंमत आहे, ती शरद पवार यांनी केली. जसं आमच्याकडे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत जे 40 चोर गेले, त्यांची किंमत ही शिवसेना, मा. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आहे. त्यामुळे ‘बाप आणि लेकीला सोडा, आमच्यासोबत या’ ही भाषा वापरणं अतिशय अमानुष आहे.
राऊत म्हणाले, संतोष देशमुखचा खून जेवढा निर्घृण आहे, तेवढीच ही भाषा क्रूर आणि निर्घृण आहे. ज्या पितृतुल्य नेत्याने तुम्हाला या स्तरावर नेलं, पण तुम्ही बाप-लेकीला सोडा, ही भाषा वापरण्यापर्यंत , या स्तरापर्यंत येता हे गंभीर आहे. केंद्रामध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी तुम्ही ही पातळी गाठता, ते क्रूर आहे. अमित शहांना खुश करण्यासाठी मोगॅम्बोला खुश करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत , ज्या कठीण परिस्थितीत शरद पवार यांनी कष्ट करून 8 खासदार निवडून आणले , त्यातले काही लोक जर सोडून जात असतील तर ते रावणाचे वंशज आहेत, अशा शब्दांत राऊतांनी टीका केली.
Sanjay Raut’s attack on Sunil Tatkare
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली