विशेष प्रतिनिधी
New Delhi News : मध्य प्रदेशातील लाडली बहना याेजनेचे शिल्पकार असलेले माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चाैहान (Shivraj Singh Chauhan) यांनी महाराष्ट्रातील लाडकी बहिण याेजनेचे काैतुक केले आहे. लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली जात असल्या बद्दल त्यांनी महायुती सरकारचे अभिनंदन केले आहे.
शिवराज सिंह चाैहान म्हणाले, लाडकी बहीण योजना राज्य सरकारने तयार केली आहे आणि राज्य सरकार ती चालवत आहे. या योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून चालवली जात आहे. परंतु, केंद्रातील मोदी सरकारचा संकल्प लखपती दीदी आहे. लखपती दीदी असा संकल्प घेऊन केंद्र सरकार पुढे जात आहे. याचा अर्थ असा की, महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत जावे. म्हणजेच महिन्याला १० हजारांची मिळकत व्हावी.
चाैहान म्हणाले, १ कोटी ४८ लाख लाभार्थी महिलांनी लखपती दीदी योजनेचा लाभ घेतला आहे. यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गरीब महिलांना पैशांसाठी कोणापुढेही हात पसरू नयेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महिलांनाही हाताला काम मिळायला हवे, त्यांनाही प्रशिक्षण मिळायला हवे. वेगवेगळ्या उद्योगांशी त्या संपर्कात याव्यात. त्या माध्यमातून त्यांना काम मिळावे. काही ठिकाणी तर महिला यातून १० लाख रुपये वर्षाला कमवत आहेत. गरिबी हटवण्याचे एक मोठे आंदोलन सुरू असून, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि राज्य सरकार यासाठी कटिबद्ध आहेत.
सगळी सोंगे आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर वचनभंगाचा आरोप केला. परंतु, या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत शिवराज सिंह चौहान यांनी राज्य सरकारचे कौतुक केले आहे.लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली जात आहे
Shivraj Singh Chauhan praised the state government for the Ladaki Bahin Yojana
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis महसूल विषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Raj Thackeray : मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
- Hasan Mushrif : पुण्यासारख्या घटना टाळण्यासाठी ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ लागू करा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
- Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख