विशेष प्रतिनिधी
बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वादग्रस्त वर्तन करत कर्तव्यावर (ड्युटीवर) असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर रागाच्या भरात हात उगारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी बेळगावमध्ये काँग्रेसच्या निषेध मोर्चादरम्यान ही घटना घडली. Siddaramaiah
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की, काँग्रेसच्या मोर्चा दरम्यान महिला भाजप कार्यकर्त्यांनी काळे कपडे दाखवत सरकारविरोधात घोषणा दिल्या. यामुळे संतप्त झालेल्या सिद्धरामय्यांनी रागाने एका पोलीस अधिकाऱ्याला मंचावर बोलावले आणि थेट त्याला थप्पड मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, पोलीस अधिकारी वेळीच बाजूला झाले आणि संभाव्य मारहाण टळली.
ही घटना वृत्तसंस्था एएनआयने प्रसारित केलेल्या व्हिडीओद्वारे उघडकीस आली आहे. व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री अत्यंत आक्रमक आणि संतापलेले दिसत आहेत.
या प्रकारानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर जोरदार टीका केली आहे. भाजप नेत्यांनी सवाल केला आहे की,”राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे संरक्षण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर जर मुख्यमंत्रीच हात उगारत असतील, तर सामान्य नागरिकांचे रक्षण कोण करणार?”
"Arrogance of power": JDS shares purported video of CM Siddaramaiah of nearly slapping police officer
Read @ANI Story https://t.co/UUw56hgm4a #JDS #Siddaramaiah #Police pic.twitter.com/S6NWTaPn2M
— ANI Digital (@ani_digital) April 28, 2025
भाजपने हा प्रकार लोकशाहीची गळचेपी आणि सत्तेचा गैरवापर असल्याचे म्हटले आहे. काही नेत्यांनी तर सिद्धरामय्यांच्या मानसिक संतुलनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या प्रकारावर काँग्रेसने अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र सत्ताधारी पक्षाकडून घटनास्थळी असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही घटना ‘उत्स्फूर्त प्रतिक्रिया’ असल्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे.
Siddaramaiah attempts to raise his hand on a police officer on duty
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती