विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतामध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला आता चांगलाच धडा शिकविला जाणार असून पाकिस्तानचे पाणी ताेडले जाणार आहे. पाकिस्तानसाठी महत्त्वाचा असलेला सिंधू जल करार स्थगित करण्यात येणार आहे. यामुळे पाकिस्तानात पाणी संकट निर्माण होऊ शकते. 1960 पासून या दोन्ही देशांमध्ये हा करार लागू आहे.
जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात संपूर्ण देशात राग आणि द्वेषाचे वातावरण आहे. या हल्ल्यानंतर परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने भारतात परत येत कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेतली. या बैठकीत भारताने सीमेपलीकडील दहशतवादाचा तीव्र निषेध करत अनेक कठोर निर्णय घेतले. दरम्यान, केंद्र सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. पाकिस्तानचा भारतातील दूतावास बंद करण्यात आला असून तेथील सर्व राजदूत तसेच भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी केवळ 48 तासांचा वेळ देण्यात आला आहे.
पहलगाम दहशतावादी हल्ल्यावरून काय कारवाई करायची यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मेस्त्री यांनी पत्रकार परिषद घेत सरकारने घेतलेले निर्णय जाहीर केले.
सिंधू जल करार पाकिस्तानसाठी फार महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे हा करार स्थगित केल्याने हा पाकिस्तानसाठी मोठा फटका मानला जात आहे. याबरोबरच भारताने पाकिस्तानमधील आपला दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला तातडीने परत जाण्यास सांगितले आहे. तसेच पाकिस्तानातील भारतीय राजदूतांना देखील परत बोलावण्यात आले आहे. सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला असून सध्या भारतात असलेल्या लोकांना तातडीने देश सोडून परतावे लागेल. याशिवाय सार्क व्हिसाच्या साहाय्याने पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश करता येणार नाही. आतापर्यंत पाकिस्तानी नागरिकांना जे व्हिसा जारी करण्यात आले आहेत, ते रद्द करण्यात येतील. आणि सध्या जे पाकिस्तानी भारतात आहेत, त्यांना 48 तासात देश सोडून जावे लागेल. यासोबतच भारत आणि पाकिस्तानमधील अटारी बॉर्डर तात्काळ प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानात गेलेले भारतीय नागरिक योग्य कागदपत्रांच्या साहाय्याने 1 मे 2025 पर्यंत भारतात परतू शकतील.
पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना भारत सरकारने गेल्या 10 वर्षांत सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करत चोख उत्तर दिले आहे. आता पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पापांचे बळी गेले. त्यामुळे या हल्ल्यानंतरही अशाच प्रकारची कठोर कारवाई देशवासीयांना अपेक्षित होती. त्यावर तशाच पद्धतीने कठोर निर्णय सरकारने घेतलेले दिसतात.
Sindhu Water Treaty suspended, Pakistan will be taught a lesson by cutting off water
महत्वाच्या बातम्या
- लग्नानंतर सात दिवसांनी हनिमूनसाठी गेलेल्या भारतीय नाैदलातील अधिकाऱ्याचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
- मेळघाटातील कुपाेषणावर काय उपाययाेजना केल्या? काॅंग्रेसच्या नेत्या यशाेमती ठाकूर यांचा सवाल
- Ashish Shelar : उद्धव ठाकरे हे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशहा, आशिष शेलार यांचा आरोप
- UPSC 2024 निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात अव्वल, पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा ; महाराष्ट्राची कामगिरी उजळली