विशेष प्रतिनिधी
मुंबई : Pahalgam attack दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात मंगळवारी झालेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे.Pahalgam attack
डोंबिवलीच्या अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले या तिघांचा आणि पनवेलच्या दिलीप देसले यांचाही या भ्याड हल्यात मृत्यू झाला आहे. तर पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
तुल मोने हे रेलेच्या परळ येथील वर्क शॉप विभागात सेक्शन इंजिनीअर पदावर कार्यरत होते. अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेच्या ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहतात. ते त्यांची पत्नी आणि मुलीसह पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले होते. डोंबिवलीत भागातील शाळा मैदान परिसरात राहणारे हेमंत जोशी आणि सुभाष रोड परिसरात राहणारे संजय लेले हेदेखील त्यांच्या कुटुंबास पहलगामला गेले होते. या तिघांना मंगळवारी दुपारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये प्राण गमवावे लागले. पनवेलचे माणिक पटेल आणि एस. भालचंद्रराव हे दोन पर्यटकही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती काश्मीर प्रशासनाने दिली.
पनवेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता निसर्ग ट्रॅव्हल्स पनवेल येथून एकूण 39 पर्यटक जम्मू कश्मीर पर्यटनासाठी गेले होते. त्यातील पनवेलच्या खांदा कॉलनी येथे राहणारे दिलीप देसले यांचा मृत्यू झाला आहे. पनवेल येथील रहिवासी सुबोध पाटील हे जखमी झाले आहे. त्यांना व त्यांच्या पत्नीला एअरलिफ्ट करून श्रीनगर येथे आणण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पुण्यातील जगदाळे व गनबोटे अशी दोन कुटुंब पर्यटनासाठी गेली होती. त्यामध्ये संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे या दोघांना हल्ल्यात गोळ्या लागल्या यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची झाल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे जम्मू-काश्मीर येथील जगदाळे आणि गनबोटे यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत. माझ्या डोळ्यासमोरच वडिलांना गोळ्या झाडल्याचे मुलीने सांगितल्यावर काळीज हेलावले असल्याचे ते म्हणाले.जम्मू- काश्मीर येथे महाराष्ट्रातील पुण्यासह विविध भागांतून पर्यटक फिरायला गेले आहेत. पुण्यातील गनबोटे आणि जगदाळे अशी दोन कुटुंबे होती. त्यामध्ये आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे, तसेच कौस्तुभ गनबोटे व संगीता गनबोटे यांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यात यातील संतोष आणि कौस्तुभ यांना गोळ्या लागल्या. यातील एकाच्या अंगात तीन गोळ्या घुसल्या असल्याचे समजते. दोन्ही कुटुंबे मूळची बारामती तालुक्यातील असून, सध्या पुण्यात कर्वेनगरमध्ये वेदांतनगरीजवळ राहतात.याबाबत घटनेनंतर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले होते की, ‘मी जगदाळे यांची मुलगी, पत्नी, तसेच गनबोटे यांची पत्नी अशा तिघांच्याही संपर्कात आहे. हल्ल्यात जखमी झालेले जगदाळे आणि गनबोटे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले , त्यांच्या कुटुंबालाही लष्कराने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. मात्र, त्यांना उपचारासाठी कोणत्या रुग्णालयात नेले , हे कुटुंबाला सांगण्यात आलेले नाही.
Six tourists from Maharashtra, including two from Pune, killed in Pahalgam attack
महत्वाच्या बातम्या
- लग्नानंतर सात दिवसांनी हनिमूनसाठी गेलेल्या भारतीय नाैदलातील अधिकाऱ्याचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
- मेळघाटातील कुपाेषणावर काय उपाययाेजना केल्या? काॅंग्रेसच्या नेत्या यशाेमती ठाकूर यांचा सवाल
- Ashish Shelar : उद्धव ठाकरे हे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशहा, आशिष शेलार यांचा आरोप
- UPSC 2024 निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात अव्वल, पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा ; महाराष्ट्राची कामगिरी उजळली