वृत्तसंस्था
सेऊल : रविवारी बँकॉकहून येणारे जेजू एअरचे विमान दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. या अपघातात विमानातील 181 जणांपैकी 28 जणांना आपला जीव गमवावा लागला. योनहाप न्यूज एजन्सीने मुआन विमानतळावर लँडिंग करताना विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याचे वृत्त दिले आहे. यानंतर विमान विमानतळाच्या कुंपणाला आदळले आणि कोसळले.
एजन्सीच्या म्हणण्यानुसार, ‘या विमानात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते, विमान मुआन विमानतळावर कोसळले. या अपघातात 28 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. दक्षिण कोरियाच्या दक्षिण जिओला येथे असलेल्या दक्षिण-पश्चिम कोस्टल विमानतळावर भारतीय वेळेनुसार सकाळी 5:37 वाजता (स्थानिक वेळेनुसार 9:07 वाजता) विमान अपघात झाला.
२ जणांना जिवंत बाहेर काढले, बचावकार्य सुरू
मुआन विमानतळाच्या अग्निशमन अधिकाऱ्याने वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, विमानातील आग आटोक्यात आणण्यात आली आहे. आतापर्यंत 2 जणांना विमानातून जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे. बहुतांश लोक विमानाच्या मागील बाजूस होते, त्यांना तेथून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विमानातील बहुतांश प्रवासी दक्षिण कोरियाचे होते. याशिवाय 2 थायलंडचे नागरिकही होते.
कझाकस्तानमध्ये ४ दिवसांपूर्वी विमान अपघात झाला होता
25 डिसेंबर रोजी अझरबैजानहून रशियाला जाणारे विमान कझाकिस्तानमधील अकताऊ विमानतळाजवळ कोसळले. विमानात 5 क्रू मेंबर्ससह 67 लोक होते. त्यापैकी 38 जणांचा मृत्यू झाला होता. अझरबैजानची राजधानी बाकू येथून हे विमान ग्रोझनी येथे पोहोचणार होते.
Plane carrying 181 people crashes in South Korea
महत्वाच्या बातम्या
- Abdul Rehman Makki : मुंबई 26/11 हल्ल्याचा कट रचणारा अब्दुल रहमान मक्की याचे निधन
- Manmohan Singh मनमोहन सिंग यांचा अपमान करणाऱ्या नवाज शरीफ यांना मोदींनी दाखविली होती ‘औकात’
- Manmohan Singh : शिष्याचा सन्मान करायची “पश्चातबुद्धी” गुरूचा अपमान कसा भरून काढेल??
- Indian Economy : पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.5% दराने वाढणार; दुसऱ्या तिमाहीत विकास दर 21 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर