विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अश्लीलता तसेच शिवराळ भाषेचा माेठ्या प्रमाणावर वापर हाेत आहे. त्याचा समाजावर वाईट परिणाम हाेत आहे.यामुळे बिग बॉस Bigg Boss हा कार्यक्रम बंद करण्याची मागणी भाजपचे खासदार अनिल फिरोजिया यांनी गुरुवारी लोकसभेत ही मागणी केली. हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा तो केवळ एक साधा कार्यक्रम होता. मात्र, नंतर त्यात अश्लीलता आणि शिवराळ भाषेचे प्रमाण वाढले. यामुळे हा कार्यक्रम केवळ प्रेक्षकांसाठीच नाही तर समाजासाठी धोकादायक ठरू शकतो, असे फिरोजिया यांचे म्हणणे आहे.
मध्य प्रदेशातील उज्जैन येथून लोकसभा खासदार असलेले फिरोजिया यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा विषय उपस्थित केला. बिग बॉसचे भारतात अनेक चाहते आहेत. कोट्यवधी प्रेक्षक हा कार्यक्रम पाहात असतात. सातत्याने शिवराळ भाषेचा वापर होतो तसेच वादविवाद दाखवले जातात. तसेच अनेकदा स्पर्धकांचे वैयक्तिक जीवन अत्यंत वाईट पद्धतीने समोर आणले जाते. अशाप्रकारचा कंटेंट असल्याने समाजावर याचा परिणाम होत असून समाजातील तरुण तसेच मुलांवर या कार्यक्रमाचा वाईट परिणाम होतो. हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक अभिनेता सलमान खान याचे नाव घेऊन हा आणि अशाच प्रकारचे अन्य कार्यक्रम बंद करण्यात यावेत अशी मागणी आपण करत असल्याचे फिरोजिया यांनी सांगितले.
अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी दीवार आणि शोले या चित्रपटांना 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एक स्टॅम्प काढण्याची मागणी केली आहे. यामुळे नवीन पिढी जुन्या पिढीशी जोडलेली राहील. तसेच भारतीय चित्रपट सृष्टीचा वारसा जपला जाईल, असेही त्या म्हणाल्या.
Stop Bigg Boss with obscenity, foul language, demands BJP MP in Lok Sabha
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची