विशेष प्रतिनिधी
बँकॉक: म्यानमार, थायलंड, बांग्लादेशात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल इतकी आहे. भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. Earthquake
बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळल्यानंतर अनेक जण इमारतीखाली अडकले आहेत. म्यानमारमध्ये मांडलेय शहरात भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शहरातील अनेक मंदिरं आणि बौद्ध स्थळांची मोठी हानी झाली आहे. बांग्लादेशची राजधानी ढाक्यासह चटगाव आणि अन्य शहरातही भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे.
बँकॉकमध्ये भूकंपानं मोठं नुकसान झाले आहे. भूकंपाचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. त्यात अनेक नागरिक त्यांच्या घरातून बाहेर पळताना, रस्त्यावर सैरावैरा धावताना दिसत आहेत. भूकंपाच्या धक्क्यानं अनेक इमारती कोसळल्या. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये बहुमजली इमारत अवघ्या काही क्षणांमध्ये जमीनदोस्त झाली.
बँकॉकमधील एका ३० मजली इमारतीत किमान ६७ लोक अडकल्याचे वृत्त आहे.असे म्हटले जाते की जेव्हा भूकंप झाला तेव्हा इमारतीत बांधकाम चालू होते. भूकंपाच्या केंद्रापासून ८०० मैल अंतरावर असलेल्या थायलंडच्या राजधानीत पहिल्या भूकंपाच्या झटक्यानंतर स्थानिक लोक प्रचंड घाबरले आणि त्यांनी त्यांच्या इमारतींमधून रस्त्यावर धाव घेतली आहे. त्यांनी या इमारती कोसळतानाचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील सागिंगजवळ होता. जर्मनीच्या GFZ भूगर्भशास्त्र केंद्र आणि भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, दुपारी झालेल्या भूकंपाची खोली 10 किलोमीटर (6.2 मैल) होती, ज्यामुळे जोरदार हादरे बसले. 7.7 रिश्टर स्केलच्या या भूकंपाच्या दोन तास आधी दोन्ही देशांमध्ये हलके धक्केही जाणवले होते.
Strong earthquake hits Myanmar, Thailand, skyscrapers collapse
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची