विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्टँड-अप कॉमेडियन स्वाती सचदेवा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या स्टँड-अप शोमधील एका जोकचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्समध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या जोकमध्ये तिने आई आणि व्हायब्रेटर यासंदर्भातील संवाद शेअर केला होता. काही आठवड्यांपूर्वी युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये पालक आणि सेक्स यासंबंधी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा कॉमेडीच्या मर्यादांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्वाती सचदेवाने आपल्या स्टँड-अप परफॉर्मन्समध्ये सांगितले की, तिच्या आईला तिचा व्हायब्रेटर सापडला आणि त्यावर झालेला संभाषणाचा अनुभव तिने विनोदी पद्धतीने मांडला. “माझी आई ‘कूल मॉम’ बनायचा प्रयत्न करत आहे, पण ते काही जमणार नाही. तिला माझा व्हायब्रेटर सापडला आणि तिने त्याला ‘गॅझेट’ किंवा ‘टॉय’ म्हणायला सुरुवात केली. मी तिला सांगितलं, ‘आई, हे खरंच पप्पांचं आहे.’ त्यावर ती म्हणाली, ‘नॉनसेन्स बोलू नकोस, मला त्यांची चॉइस माहिती आहे.’”
हा व्हिडिओ तिच्या ‘फॅमिली फर्स्ट’ या यूट्यूब शोचा भाग होता आणि त्यावर ‘प्रौढांसाठी विनोद’ असा डिस्क्लेमर देखील देण्यात आला होता. मात्र, अनेक प्रेक्षकांनी हा विनोद आक्षेपार्ह आणि कुटुंबाच्या मर्यादा ओलांडणारा असल्याचे म्हटले आहे.
या जोकबाबत इंटरनेटवर दोन गट पडले आहेत. काही लोकांना हा जोक विनोदी वाटला, तर अनेकांनी याला ‘अश्लील’ आणि ‘संस्कृतीविरोधी’ संबोधले आहे. एका वापरकर्त्याने तर “अश्लीलतेच्या नावाखाली चालणाऱ्या या प्रकारांवर कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी केली आहे. तर, समर्थन करणाऱ्यांनी “जर तुम्हाला हा विनोद नको असेल, तर पाहू नका” असे मत मांडले आहे.
या वादामुळे पुन्हा एकदा विनोदाच्या मर्यादांवर चर्चा रंगली आहे. काहींच्या मते, असे विषय भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहेत, तर काहीजण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने बोलत आहेत. याआधी रणवीर अल्लाहबादिया आणि समय रैना यांच्यावर सेक्सविषयक वक्तव्यांमुळे एफआयआर दाखल झाले होते. सध्या तरी स्वाती सचदेवा विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही, पण काहीजण तिच्याही अडचणीत येण्याची शक्यता वर्तवत आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर स्वाती सचदेवाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Swati Sachdeva’s obscene joke on mother, another stand-up comedian in the middle of controversy
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची