विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली / श्रीनगर : Pahalgam काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगामच्या बैसरण खोऱ्यात मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. हा गेल्या काही वर्षांतील सर्वात भीषण नागरी हल्ला ठरतोय, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे.Pahalgam
बैसरण हे हिवाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे पर्यटक घोड्यावरून प्रवास करून तेथे पोहोचतात. दुपारी २.४५ वाजता एका महिला पर्यटकाने पोलीस कंट्रोल रूमवर फोन करून गोळीबाराच्या आवाजाची माहिती दिली. त्यानंतर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे व लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, गोळीबार करणारे दहशतवादी लगेच जंगलात पळून गेले. त्यांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.
घटनास्थळी पोलीस, लष्कर आणि सीआरएफच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले असून, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात ताफा तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळाकडे जाणारा मार्ग अरुंद असल्याने बचावकार्य आव्हानात्मक ठरत आहे. सध्या पर्यटकांना बैसरणमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी कैसर अली यांनी दिली.
या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या TRF (The Resistance Front) या गटाने घेतल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याची अधिकृत खातरजमा झालेली नाही, असे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून त्याला “अमानुष कृत्य” असे संबोधले. त्यांनी लिहिले की, “हे हल्लेखोर म्हणजे जनावर आहेत. घटनेमुळे मला धक्का बसला आहे.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या हल्ल्याचा निषेध करताना स्पष्ट शब्दांत लिहिले की, “या अमानुष कृत्यामागे असणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. त्यांना माफ केले जाणार नाही.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजच श्रीनगरला रवाना होणार असून, तेथे सर्व सुरक्षा यंत्रणांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत पुढील कारवाईचा आराखडा ठरवला जाईल, अशी माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण असून, लष्कर आणि सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला आहे.
हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतीचं सावट पसरले आहे.
Terrorist attack on tourists in Kashmir’s Pahalgam; 25 feared dead
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत