वक्फ सुधारणा कायद्याचा प्रत्यक्ष फायदा मुस्लिम समाजालाच; पन्ना जिल्ह्यात अनधिकृत मदरशाचे स्वयंस्फूर्तीने पाडकाम
विशेष प्रतिनिधी
भोपाळ :Waqf Amendment Act वक्फ सुधारणा कायद्यावर विरोधकांकडून टीका होत असली तरी या कायद्याचा थेट लाभ मुस्लिम समाजालाच होत असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे. येथील बीडी कॉलनी परिसरात गेली ३० वर्षे अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या मदरशाचे पाडकाम स्थानिक प्रशासनाच्या देखरेखीखाली करण्यात आले असून विशेष बाब म्हणजे ही तक्रार बाहेरील कोणी नव्हे, तर स्थानिक मुस्लिम नागरिकांनीच केली होती.Waqf Amendment Act
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सदर जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असून अलीकडेच ती महानगरपालिकेच्या अखत्यारीत आली. त्यामुळे ही जागा मदरशा चालवण्यासाठी अधिकृत राहिलेली नव्हती. यापूर्वीही संबंधित संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र कायदेशीर प्रक्रिया रखडल्याने कारवाई लांबणीवर पडली होती. अखेर एका मुस्लिम नागरिकाच्या नव्याने तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने हालचाल केली.
मदरशा चालवणाऱ्यांनी प्रशासकीय कारवाई टाळत, कायद्याला सहकार्य करत स्वतःहून बुलडोझर मागवून मदरशाचे पाडकाम केले. ही कृती समाजात कायद्याचा आदर राखण्याचे आणि शासनाच्या सुधारणांना स्वीकारण्याचे सकारात्मक उदाहरण म्हणून पाहिली जात आहे.
वक्फ संशोधन अधिनियम का असर पन्ना में
अवैध रूप से बनी मदरसा को मदरसे संचालक ने स्वयं तोड़ने का काम चालू किया।#WaqfAmendmentBill@narendramodi @AmitShah @JPNadda @vdsharmabjp @HitanandSharma @vaibhavpawarmp @AshwiniUpadhyay @Ashish_HG pic.twitter.com/Wn90RkVYeG— Bhaskar pandey (@Bhaskarpandey_) April 12, 2025
या संदर्भात प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा यांनी म्हटले की, “वक्फ सुधारणा कायद्यामुळे अल्पसंख्याक समाजासाठी राखीव मालमत्तेचा योग्य वापर सुनिश्चित होईल. अनधिकृत ताबा, गैरवापर व निधी अपहारावर यामुळे रोख बसेल. पन्नामधील घटना ही या कायद्याचे पहिले फलित असून अन्य राज्यांनाही हे उदाहरण दिशादर्शक ठरेल.”
The direct benefit of the Waqf Amendment Act is only for the Muslim community; Unauthorized madrasa spontaneously demolished in Panna district
महत्वाच्या बातम्या