विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Amit Shah लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्याला सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला आहे. बोलायची वेळ दिली तेव्हा तुम्ही व्हिएतनाममध्ये होता. सभागृह तुमच्या मर्जीने चालणार आणि असे प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे.Amit Shah
संसदेच्या कामकाजावर केलेल्या टीकेवर गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “सभागृहात बोलण्याचे काही नियम आहेत जे, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याला कदाचित माहित नसतील. जे मनमानी पद्धतीने पाळता येत नाहीत. इंडिया आघाडीला अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलण्यासाठी ४२ टक्के वेळ देण्यात आला होता. आता कोण बोलणार हे त्यांनी ठरवायचे आहे. पण, जेव्हा संसदेत गंभीर चर्चा सुरू होती तेव्हा ते व्हिएतनाममध्ये होते आणि जेव्हा ते परतले तेव्हा त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार बोलण्याचा आग्रह धरला.संसद नियमांनुसार चालते, काँग्रेस पक्षाप्रमाणे नाही, जो एका कुटुंबाद्वारे चालवला जातो. जिथे तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा बोलू शकता.
कर्नाटकात काँग्रेस सरकारने मुस्लिमांसाठी जाहीर केलेले चार टक्के आरक्षण म्हणजे “लॉलीपॉप” असल्याची टीका करताना शहा म्हणाले, धर्माच्या आधारावर देण्यात येणारे कोणत्याही प्रकारचे आरक्षण हे संविधानाचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे न्यायालये ते रद्द करतील. धर्माच्या आधारावर देण्यात येणाऱ्या आरक्षणाला आमचा विरोध आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की,, “सभागृहात जेव्हा विरोधी पक्षनेता उभा राहतो, तेव्हा त्याला बोलू दिले पाहिजे, असे संकेत आहेत. मी जेव्हा सभागृहात उभा राहतो, तेव्हा मला बोलू दिले जात नाही. कशा पद्धतीने सभागृहाचे कामकाज सुरू आहे, हे मला कळत नाही. आम्ही जे बोलू इच्छितो, ते बोलू दिले जात नाही. मागच्या सात-आठ दिवसांपासून मला बोलूच दिलेले नाही. सभागृह अशाप्रकारे चालू शकत नाही. लोकशाहीमध्ये सरकार आणि विरोधक या दोघांचीही स्वतःचे एक स्थान असते. पण इथे विरोधकांचे काहीच स्थान नाही. इथे फक्त सरकारच दिसते.
The House will not function at your will, Amit Shah’s reply to Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला