विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Radha Mohandas Agarwal वक्फ (Waqf) सुधारणा कायद्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपने देशव्यापी जनजागृती मोहीम सुरू केली असून, या मोहिमेचं नेतृत्व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार राधा मोहनदास अग्रवाल करत आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की, “हा कायदा पूर्णतः मुस्लिम समाजाच्या हिताचा असून, चुकीची माहिती देणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी ही मोहीम आहे.”Radha Mohandas Agarwal
राधा मोहन दास अग्रवाल म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटतं की गरीबांचा संसाधनांवर पहिला हक्क आहे. जर वक्फ मालमत्ता योग्य पद्धतीने वापरली गेली असती, तर गरीब मुस्लीम, विधवा, घटस्फोटित महिला, अनाथ आणि ज्येष्ठ नागरिक यांना त्याचा मोठा फायदा झाला असता.”सरकारने कधीही ‘मुस्लीमांचा देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क आहे’ असं विधान केलं नाही. उलट गरीबांना प्राधान्य दिलं गेलं.
2006 साली वक्फ मालमत्ता 4.5 लाख होत्या, त्या आता 8.72 लाखांवर पोहोचल्या आहेत. क्षेत्रफळ 6 लाख एकरवरून 37.94 लाख एकरवर गेलं. तरीही उत्पन्न फक्त ₹163 कोटीवरून ₹166 कोटीपर्यंतच वाढलं. त्यांनी या वाढीव मालमत्तेवर होणाऱ्या उत्पन्नाच्या चुकीच्या व्यवस्थापनाचा आरोप काँग्रेस, AIMIM, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि वक्फ बोर्डांतील काही नेत्यांवर केला.
अग्रवाल म्हणाले, “1995 आणि 2013 मध्ये काँग्रेसने केलेल्या सुधारणा अत्यंत एकतर्फी होत्या. वक्फ बोर्ड कोणाचीही मालमत्ता नोटीस न देता ताब्यात घेऊ शकत होती आणि व्यक्तीला अपीलसाठी पुन्हा त्याच बोर्डाकडे जावं लागत होतं. आता त्या त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या आहेत.” नव्या कायद्यात वक्फ बोर्डात २ मुस्लिमेतर सदस्य असतील जे हिंदूंकडील बाजू मांडू शकतील. निर्णय बहुमतानेच घेतला जाईल, परंतु ही तरतूद फक्त संतुलनासाठी आहे, कोणताही अधिकार बळकावण्यासाठी नाही.
ही मोहीम मुस्लीम समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे. AIMIM आणि काही वक्फ माफियांनी मुस्लिम समाजाला चुकीची माहिती दिली आहे, खरे चित्र दाखवणं आमचं उद्दिष्ट आहे..भाजपने यासाठी ४ पानी पत्रक आणि १६ पानी माहितीपुस्तिका तयार केली असून, प्रत्येक मुस्लिम कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला आहे, असे त्यांनी सांगितले. “ओवैसींसारखे नेते आणि AIMPLB जाणीवपूर्वक मुस्लिम समाजात गैरसमज पसरवत आहेत. त्यांच्या प्रोपगंडाविरुद्ध सत्य मांडण्यासाठी ही मोहीम गरजेची आहे.”
The new Waqf Act will benefit the Muslim community, claims Radha Mohandas Agarwal
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत