विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Prime Minister दहशतवादाचा बीमोड करणे हे आपल्या राष्ट्रीय संकल्पाचे प्रतीक आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला कारवाईच्या पद्धती, लक्ष्य आणि वेळ निश्चित करण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.Prime Minister
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार विविध प्रतिकारात्मक उपाययोजनांचा विचार करत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नवी दिल्लीत संरक्षण दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठक पंतप्रधानांच्या लोककल्याण मार्गावरील (७, लोककल्याण मार्ग) निवासस्थानी झाली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह आणि नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी सैन्यदलांच्या व्यावसायिक क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त करत म्हटले, “दहशतवादाचा बीमोड करणे हे आपल्या राष्ट्रीय संकल्पाचे प्रतीक आहे. देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
या संदर्भात कैबिनेट सुरक्षा समितीची (CCS) आणखी एक बैठक उद्या ( बुधवार) बोलावण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ही समितीची दुसरी बैठक असेल. या बैठकीत भारताची प्रतिकारात्मक रणनीती आणि संभाव्य प्रतिसादावर अंतिम निर्णय घेतला जाईल.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये बहुतांश जण पर्यटक होते. गेल्या काही वर्षांतील हा काश्मीरमध्ये घडलेला सर्वात भीषण दहशतवादी हल्ला मानला जात आहे.
The Prime Minister gave the army complete freedom to decide the methods, targets and timing of operations.
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती