सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात वंजारी समाज आक्रमक
विशेष प्रतिनिधी
बीड : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात बीड मधील वंजारी समाज आक्रमक झाला आहे. बीड जिल्ह्यातील प्रशासनात वंजारी समाजाचे लोकच असल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजातील लोकांना पोलिसात भरती केले. शासनात भरती केले.मग हळूहळू त्यांना बीडकडे आणण्यात गेलं. हे लोक इतर समाजाच्या लोकांबरोबर काय न्याय करणार?
इतर समाजाचे लोक या लोकांकडे गेल्यास त्यांना न्याय मिळणं शक्यच नाही. असे आरोप दमानिया यांनी केले होते.या वक्तव्याने वंजारी समाज आक्रमक झाला असून दमानिया यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठिय्या मांडण्यात आला.. दमानिया यांच्या वादग्रस्त विधाने दोन समाजात वितुष्ट निर्माण होत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वंजारी समाज आग्रही आहे. केशव तांदळे यांनी याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.
अंजली दमानिया समाजसेवक आहेत की दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सेवक आहेत? असा सवाल भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे. ते म्हणाले, दमानिया यांनी एक ट्विट करून बीड जिल्ह्यात विशिष्ट समाजाचे लोक काम करतात. त्यांनी जातीचा उल्लेख वंजारी केला.वास्तविक कोणताही समाजसेवक समाजात दुही संघर्ष वाढेल असं वक्तव्य करत नाही.. पण दमानिया कोणतीही माहिती घेवून जास्त बोलतात?
बीड जिल्ह्यात सध्या वरिष्ठ अधिकारी वंजारी नाहीत.तुम्ही जे बीड जिल्ह्याला टार्गेट करता इतर प्रश्नावर नक्की आवाज उठवा असा सल्ला देत कुलकर्णी यांनी तुम्ही समाजात, जातीत भांडण लावत असाल तर तुम्ही समाज सेवक नाही हे लक्षात घ्या अशी टीका केली आहे.
Vanjari community aggressive against social activist Anjali Damania
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- Goa : गोवा बनावटीची 31 लाख रुपयांची दारू जप्त
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट