विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ashwini Vaishnav वेव्हज शिखर परिषद भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देणारे जागतिक व्यासपीठ बनेल असा विश्वास केंद्रीय मंत्री केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.Ashwini Vaishnav
अश्विनी वैष्णव यांनीमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी भारतात प्रथमच आयोजित होणाऱ्या ‘वेव्हज 2025’ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज विविध राष्ट्रीय व प्रादेशिक वृत्तमाध्यम संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या संवादात त्यांनी भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील दिशा, आव्हाने आणि संधी यावर सखोल चर्चा केली.
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
वेव्हज परिषदेसाठी आतापर्यंत 1 लाखाहून अधिक नोंदण्या झाल्याची माहिती त्यांनी दिली. या परिषदेत 750 आघाडीचे सर्जनशील कलाकार आपले काम सादर करणार आहेत. भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’ ला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दृष्टीकोन महत्त्वाचा ठरला असल्याचे त्यांनी नमूद केले.
वैष्णव म्हणाले की, “ज्या पद्धतीने दावोस हे जागतिक आर्थिक धोरणांचे केंद्र बनले आहे, त्याचप्रमाणे ‘वेव्हज’ हे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक व्यासपीठ म्हणून उदयास येत आहे.
माध्यम क्षेत्रात सध्या मूलगामी बदल सुरू असून तंत्रज्ञानामुळे पारंपरिक प्रारूपांऐवजी नव्या स्वरूपांना चालना मिळत आहे. पूर्वी आशय निर्मितीसाठी मोठ्या स्टुडिओंची गरज होती, पण आता झारखंड किंवा केरळसारख्या दुर्गम भागांतूनही सर्जनशील कलाकार दर्जेदार कंटेंट तयार करत आहेत, असे सांगून वैष्णव म्हणाले, या परिषदेच्या माध्यमातून कलाकार, खरेदीदार आणि बाजारपेठा यांना एकत्र आणणारे व्यासपीठ निर्माण झाले असून, स्टार्टअप्स, टेक कंपन्या आणि सर्जनशील क्षेत्रातील उद्योगांना एकमेकांशी जोडणारे हे केंद्र बनणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी देखील सहभाग घेतला. त्यांनी माध्यम क्षेत्राशी संबंधित धोरणे आखताना सहभाग, संवाद आणि सहकार्य यांचा महत्व अधोरेखित केला. उपस्थित सर्व माध्यम संस्थांनी वेव्हज परिषदेबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सरकारच्या पुढाकाराचे स्वागत केले.
वेव्हज 2025 परिषद 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत पार पडणार असून, ही परिषद भारताच्या सर्जनशीलतेचे जागतिक प्रदर्शन ठरणार आहे.
Waves Summit is a global platform to boost India’s creative economy, believes Union Minister Ashwini Vaishnav
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
- Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव
- Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका
- MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना