विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Mohan Bhagvat आम्ही शेजाऱ्यांना कधीही त्रास देत नाही. मात्र, ते आपल्या धर्माचे पालन करणार नसतील तर आपल्या प्रजेचे रक्षण करणे हा राजाचा धर्म आहे. यामुळे राजा आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी जे पावले उचलेल, ते लोक लक्षात ठेवतील, असे सांगत पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकविण्याची सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे.Mohan Bhagvat
दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रम सरसंघचालक मोहन भागवत आणि उपस्थितांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या निष्पाप लोकांसाठी दोन मिनिटांचे मौन पाळले. यावेळी बाेलताना सरसंघचालक म्हणाले, अहिंसा हा आपला मुळ स्वभाव आहे. मात्र काही लोक बिघडलेले आहेत. मी मुंबईत रावणाचा उल्लेख केला होता. कारण रावणात सर्व काही होते, पण त्याचे मन अहिंसे विरोधात होते. यामुळे रामाने त्याचा वध केला. याच प्रकारे गुंडांकडून मार न खाणेही आपला धर्म आहे. त्यांना धडा शिकवणे आपला धर्म आहे.
दिल्लीतील कार्यक्रमाच्या आयोजनात हिंदू मॅनिफेस्टोचा विषय दिसला असे सांगून भागवत म्हणाले, हे एक असे प्रपोजल आहे ज्याची सर्वांनी चर्चा करायला हवी आणि ज्यावर सर्वांची सहमती व्हायला हवी. अशा सहमतीची आवश्यकता काय? तर जगाला नवा मार्ग हवा आहे. विश्व कल्याणासाठी, मानवतेच्या रक्षणासाठी मानवतेसाठी तिसरा मार्ग हवा आहे. तो भारताकडे आहे. तो भारताने आपल्या परंपरेतून द्यायला हवा.
केवळ कर्मकांड म्हणजे धर्म नाही या मताचा पुनरुच्चार करत सरसंघचालक म्हणाले, आपण धर्माला केवळ कर्मकांडच समजलो. आपण धर्म प्रार्थनास्थळे आणि खाण-पाणाच्या पद्धतीशी जोडला. अर्थात पूजापाठ आणि काय खावे यातच धर्म मानला. सर्वांचे मार्ग त्यांच्यासाठी योग्य असतात. माझा मार्ग माझ्यासाठी योग्य आहे, पण मी इतरांच्या मार्गाचाही आदर करतो. मात्र, माझेच चांगले आणि इतरांचं वाईट असे नसावे. आज हिंदू समाजाला हिंदू धर्म समजून घेण्याची गरज आहे.
We don’t bother neighbors, but if they are not religious… Mohan Bhagvat suggestion to teach Pakistan a lesson
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला