विशेष प्रतिनिधी
New Delhi News: गेल्याच आठवड्यात “आम्हाला बोलू दिलं जात नाही”, “आमचा आवाज दाबला जातो” अशा आरोपांची सरबत्ती करणारे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वक्फच्या महत्वाच्या विधेयकावर चर्चा सुरू असताना माैनव्रत पाळले. त्यामुळे आता काेणी केली बाेलती बंद अशी टीका हाेत आहे.
संसदेमध्ये वक्फ संशोधन विधेयकावर महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संधी असूनही यावर एकही शब्द न बोलता मौन पाळले. संसदेत चर्चा सुरू असताना राहुल गांधी इतर सदस्यांचे भाषण सुरू असतानाही मोबाईलमध्ये गुंग होते . संध्याकाळी अधिवेशन सुरू असतानाच ते घरी निघून गेले. मात्र मध्यरात्री २ वाजता मतदानाच्या वेळी ते ट्रॅक पँट आणि स्लीपर घालून संसदेत पोहोचले आणि मतदान करून लगेच सभागृहातून निघून गेले. त्यांच्या पेहरावाबाबतही टीका हाेत आहे.
त्याहून गंभीर बाब म्हणजे मतदानानंतर रात्री २.३० वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरवर चर्चा सुरू करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा ठराव संमत करून घेतला. गेल्या दोन वर्षांपासून मणिपूरच्या नावावर आंदोलन करणारे राहुल गांधी या चर्चेला अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावर “रणछोडदास” अशी टीका होत आहे.
जो नेता संसदेतील महत्त्वाच्या चर्चा, विधेयक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्यांवर गप्प बसतो, तो देशाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य का? असा सवाल विराेधकांकडून केला जात आहे.
Why the Silence? Rahul Gandhi Takes a Vow of Silence Amidst Discussion on Waqf Bil
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा