विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : C. R. Patil पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने १९६० चा सिंधू जल करार निलंबित केल्यानंतर गृह मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की पाकिस्तानकडे भारतातून एक थेंबही पाणी जाणार नाही.”C. R. Patil
या बैठकीत विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते. पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले असून या बैठकीचे उद्दिष्ट त्यांची अंमलबजावणी निश्चित करणे होते. पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की मोदी सरकारचा सिंधू जल करारावरील ऐतिहासिक निर्णय हा कायदेशीर असून राष्ट्रीय हितासाठी अत्यंत आवश्यक आहे. पाकिस्तानकडे एक थेंबही पाणी जाऊ दिले जाणार नाही.”
या पार्श्वभूमीवर जम्मू आणि कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील सिंधू जल कराराच्या निलंबनाचे स्वागत केले. त्यांनी म्हटले की,हा करार जम्मू-कश्मीरच्या जनतेसाठी कधीच योग्य नव्हता. आम्ही याला समर्थन दिलेले नव्हते. आता केंद्र सरकारने उचललेली पावले योग्य दिशेने आहेत. दीर्घकालीन परिणाम काय असतील, ते येणारा काळच सांगेल.
भारत सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला दहशतवादाचा प्रत्युत्तर देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पष्ट आणि ठाम संदेश दिला आहे. दहशतवादाला कोणतीही सहनशीलता न ठेवता भारताने आता पाणीपुरवठा रोखण्याच्या माध्यमातून आर्थिक आणि नैसर्गिक संसाधनांच्या आघाडीवर दबाव आणण्याची भूमिका स्वीकारली आहे.
केंद्र सरकार लवकरच दीर्घकालीन धोरण आखण्याच्या तयारीत असून, या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी यंत्रणा सज्ज केली जात आहे.
Will not give even a drop of water to Pakistan, warns Jal Shakti Minister C. R. Patil
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला