onion : कांदा निर्यातीवरील 20 टक्के निर्यात शुल्क हटविणार

onion : कांदा निर्यातीवरील 20 टक्के निर्यात शुल्क हटविणार

onion

विशेष प्रतिनिधी

मुंबई : onion कांदा निर्यातीवरील 20 टक्के निर्यात शुल्क हटविले जाणार असून त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने कांदा विकून टाकल्यावर हा निर्णय झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.onion

नुकतेच केंद्र सरकारने यासंदभार्त एक अधिसूचना जारी केली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निर्णयाचे स्वागत केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात कृषिमंत्री म्हणून केंद्र सरकारला याबाबत केलेल्या पत्र व्यवहार आणि पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कांदा निर्यातीवर आकारण्यात येणारा 20 टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

“देशांतर्गत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने यापूर्वी 8 डिसेंबर 2023 ते 3 मे 2024 या कालावधीत निर्यातीवर निर्बंध लादले होते. यामध्ये निर्यात शुल्क, किमान निर्यात किंमत (MEP) आणि पूर्णतः निर्यातबंदी यांचा समावेश होता. 13 सप्टेंबर 2024 पासून लागू असलेले 20% निर्यात शुल्क आता रद्द करण्यात आले आहे. देशातून कांदा निर्यातीवरील निर्बंध असतानाही 2023-24 आर्थिक वर्षात एकूण 17.17 लाख मेट्रिक टन (LMT) तर 2024-25 आर्थिक वर्षात (18 मार्चपर्यंत) 11.65 LMT कांद्याची निर्यात झाली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये 0.72 LMT असलेली मासिक निर्यात जानेवारी 2025 मध्ये 1.85 LMT पर्यंत वाढली होती.हा निर्णय शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी घेण्यात आला आहे.” अशी माहिती कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी दिली.

विरोधक, लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर अखेर कांद्यावर लावलेलं 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची उपरती केंद्राला झाली. पण तोपर्यंत शेतकऱ्यांना आपल्याकडील कांदा कवडीमोल भावात विकावा लागला, याचं काय? या अन्यायकारक निर्यात शुल्कामुळे आजवर शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालं त्याचीही जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा केवळ स्वतःची पाठ थोपटण्यासाठीच हा निर्णय घेतला, असंच म्हणावं लागेल, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

20 percent export duty on onion exports to be removed

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023