विशेष प्रतिनिधी
पुणे : Santosh Deshmukh बीड जिल्हयातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींमधील दोघांना पोलिसांनी पकडलं आहे. गेल्या महिनाभरापासून फरार असलेले मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पोलिसांच्या हाती लागले आहेतSantosh Deshmukh.
खुनातील फरार आरोपी अटक करण्यासाठी बीड पोलीसाचे विशेष शोध पथक नेमण्यात आले होते. डॉ. संभाजी वायभसे याची चौकशी करुन गोपनीय माहितगार नेमत आणि तांत्रिक कौशल्याचा उपयोग करुन सुदर्शन चंद्रभान घुले (वय 26 रा.टाकळी ता.केज )आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे ( वय 23 रा. टाकळी ता.केज) यांना ताब्यात घेतलं आहे. आता या आरोपींना गुन्हे अन्वेषण विभाग बीडचे अनिल गुजर, पोलीस उप अधीक्षक यांच्या ताब्यात देणयात आलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांना आधी पोलिसांनी अटक केली होती. तीन आरोपी फरार होते, यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे फरार होते. यामधील आता सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पोलिसांना अटक केली आहे. मात्र कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. ९ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून मुख्य आरोपी फरार होते.
Absconding Sudarshan Ghule, Sudhir Sangle in Santosh Deshmukh’s murder case have finally been found
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- Goa : गोवा बनावटीची 31 लाख रुपयांची दारू जप्त
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट