दहा दिवसात आरोपींना अटक, मस्साजोग येथील जलआंदोलन पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीनंतर मागे

दहा दिवसात आरोपींना अटक, मस्साजोग येथील जलआंदोलन पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीनंतर मागे

विशेष प्रतिनिधी

बीड : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी थेट तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये पुरुषांसह महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. तब्बल तासभर चाललेल्या आंदोलनाला पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी भेट दिल्यानंतर गावकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कावत यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली. बीड पोलिसांचे पूर्ण प्रयत्न सुरु आहेत, उरलेल्या तीन आरोपींना लवकरात लवकर अटक होईल. ग्रामस्थांनी 10 दिवसांचा वेळ दिला आहे.10 दिवसांच्या आत आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशमुख कुटुंबाला संरक्षण दिले आहे. एसआयटी बाबत शासनाने जीआर काढला आहे, असेही कावत म्हणाले.

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी यासाठी मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. देशमुख हत्या प्रकरणात सात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल असून त्यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहे. घटनेला 22 दिवस उलटून देखील आरोपी सापडले नसल्याने नागरिकांनी हे आंदोलन केले.

Devendra Fadnavis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यादीत पहिल्या दहा मध्ये ही नाहीत!

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराडने कल पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या ( सीआयडी) कार्यालयात स्वतः येऊन शरणागती पत्करली होती.

वाल्मिक कराड याच्यासह फरार आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच वाल्मिक कराड याच्या नातेवाईकांची देखील बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे अद्याप सापडले नाहीत. त्यांची हत्या झाल्याचा संशय सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी व्यक्त केला होता.
जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे.

Accused arrested within 10 days, Jal Andolan in Massajog backed off after intervention of Superintendent of Police

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023