विशेष प्रतिनिधी
बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींपैकी तीन आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुलीदिली आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडसमोरील अडचणी वाढणार आहेत. आरोपी सुदर्शन घुलेसह तीन आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे. वाढदिवसाच्या दिवशी मारहाण करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग आल्याने हत्या केल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींपैकी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशीत आपला गुन्हा कबुल केला आहे. आपणच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
गुन्हा आपण केलाच नसल्याचा दावा करणाऱ्या सुदर्शन घुले याला आवादा कंपनीतील धमकी देतानाचा व्हिडिओ दाखवल्यावर तो बोलायला लागला… होय आम्हीच अपहरण केलं आणि आम्हीच हत्या केली अशी कबुली घुले याने दिली. खंडणी प्रकरणात देशमुख हे अडथळा ठरत होते. अवादा कंपनी परिसरात देशमुख आणि ग्रामस्थांनी मिळून वाढदिवस असतानाच आम्हाला मारहाण केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग मनात होता आणि म्हणून हत्या केल्याची कबुली घुलेने दिली आहे.
सुदर्शन घुले अवादा कंपनीत खंडणी मागण्यासाठी गेला होता त्यावेळी कंपनीचे थोपटे आणि शिंदे बसले होते. त्यांनी आपल्या खिशात मोबाईल ठेवला होता आणि या मोबाईल कॅमेऱ्यात सुदर्शन घुले खंडणी मागत असल्याचं कैद केलं होतं. आपण खंडणी मागितली नसल्याचं आणि हत्या केली नसल्याचं म्हणणाऱ्या सुदर्शन घुलेला हा व्हिडिओ दाखवला आणि त्यानंतर आरोपी घुलेने आपली कबुली दिली. आपणच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यापासून हत्यारे कुठून आणली, देशमुखांना मारहाण का केली, मित्राचा वाढदिवस असताना आम्हाला मारहाण केली आणि त्यानंतर व्हिडिओ व्हायरल केला याचा राग मनात होता असेही घुलेने सांगितले.
Accused confess that they killed Santosh Deshmukh, anger over beating him on his birthday and video going viral
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप