भोर: Sangram Thopte तुम्ही गेले अनेक वर्ष काँग्रेसचे काम करत आहात. हे काम करत असताना तुम्हाला पक्षाकडून सातत्याने डावलण्यात आले असे कार्यकर्तेच म्हणू लागले आहेत. त्यामुळेच काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असल्याचे संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केले.Sangram Thopte
माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त येत्या 22 तारखेला ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ते म्हणाले
जनतेने मतदारसंघात तीन वेळा संधी दिली. तुम्ही जरी मतदारसंघात विकास कामं केली असली तरी सुद्धा अजूनही विकासाला गती द्यायची असेल तर आपल्याला दुसऱ्या पक्षात जावं लागेल, त्या पद्धतीचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये झालेला आहे.
काँग्रेसनेच माझ्यावर पक्ष सोडण्याची वेळ आणली असा आरोप करताना थोपटे म्हणाले, 2009 साली मी पहिल्यांदा या मतदारसंघातून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो. पक्षानं मला उमेदवारी दिली. जनतेनं मला कौल दिला म्हणून मी निवडून आलो. तेव्हा मी नवीन होतो. नवीन लोकप्रतिनिधी म्हणून मी विधानसभेत काम कोलं. 20o14 ला मी पुन्हा निवडून आलो. तेव्हा राज्यात विरोधी पक्षाचं सरकार होतं, 2019 मध्ये मला पुन्हा संधी मिळली, त्यावेळी कोणालाही वाटत नव्हतं की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, अचानक तीन्ही पक्षाची युती झाली आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. काँग्रेसच्या वाट्याला बारा मंत्रिपदं आली. पुणे जिल्हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मोठा जिल्हा म्हणून पुण्याला मंत्रिपद मिळेल, आणि मंत्रिपद मिळत असताना विधानसभेतील अनुभव आणि कार्यकाळ पाहाता मला मंत्रिपद मिळेल अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. ती संधी थोडक्यात हुकली. मी म्हटलं ठीक आहे, पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो. त्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हा मला वाटलं संधी मिळेल, पण तेव्हाही मला संधी मिळाली नाही. एवढं मोठं संविधानिक पद महिनाभर रिक्त राहिलं. विरोधी पक्षनेते पदावेळी देखील तसेच झाले.
Activists started saying that the party is abandoning you, Sangram Thopte revealed the reason for leaving Congress
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत