विशेष प्रतिनिधी
मुंबई: माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले होते. आज युवा सेनेचे प्रमुख आणि नाही मंत्री आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ईव्हीएमचं सरकार की जनतेचं सरकार आहे हा संशय अद्याप आहेच. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आम्ही विरोधी पक्ष म्हणून जर विषय मांडत असू तर काहीही चुकीचं नाही. आमचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यांच्या भेटी होत होत्या. आमचं एकत्र सरकार असतानाही आम्ही भेटत होतो. जनहिताच्या कामासाठी ज्या भेटीगाठी होतात त्यात गैर काय?
मुखमंत्र्यांकडे केलेल्या मागण्याची माहिती देताना ठाकरे म्हणाले, ज्या गृहनिर्माण संस्था असतात त्यात निवृत्त पोलिसांना १५० रुपये प्रति चौरस फूट दंड शुल्क लावण्यात आलं आहे. हा खर्च निवृत्त पोलिसांना परवड नाही. त्यामुळे हे शुल्क २० रुपये प्रति चौरस फुटांवर आणावं. हे दंड शुल्क कुणालाही परवडत नाही. दोन ते तीन पिढ्यांपासून मुंबईची सेवा करणारे लोक तिथे राहतात, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली.
दुसरी मागणी ही केली की आधीही मागच्या सरकारमध्ये आश्वासन देण्यात आलं होतं की निवृत्त पोलिसांना मुंबईत घरं दिली जावीत. अद्याप ती घरं देण्यात आलेली नाहीत. नवी मुंबईचा पर्याय नको, मुंबईतच घरं कशी मिळतील? हे सरकारने पहावं अशी मागणी आम्ही केली आहे.
Aditya Thackeray met Chief Minister Devendra Fadnavis and made these demands
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली