विशेष प्रतिनिधी
पुणे : बारामतीच्या विकासाचे शिल्पकार ज्येष्ठ नेते शरद पवार यांना म्हटले जाते. मात्र, विकासासाठी मी जेव्हढे काम केले तितके काेणीही केले नाही असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना टाेला लगावला आहे. 1952 पासून झालेल्या आमदारात सर्वाधिक काम मीच केले असा दावा त्यांनी केला आहे.
बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीपासून काल पर्यंतच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत झालेल्या विकासकामांची तुलना केली. ते म्हणाले, बारामतीत मी आतापर्यंत जेवढं काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. 1952 पासून आतापर्यंत जे आमदार झाले, त्यांनी काय कामे केलं ते पाहा आणि मी केलेलं काम पाहा. मी अजूनही काम करणार आहे.
शरद पवार 1967 पासून बारामती विधानसभा मतदारसंघात निवडून येत आहेत. मुख्यमंत्रीपदही त्यांनी सांभाळले आहे. शरद पवार आपल्या बारामतीच्या विकासाच्या माॅडेलची चर्चा देशभर करत असतात. मात्र, अजित पवार यांनी बारामतीत सर्वात जास्त विकासकामे आपण केल्याचा दावा केला आहे.
कार्यक्रम स्थळी नागरिक उन्हात असल्यामुळे अजित दादा बीडीओंवर संतापले. ‘उन्हात कार्यक्रम आहे. सावलीत भाषण असतं तर बरं झालं असतं. उन्हात भाषण करायला बरं वाटत नाही. बीडीओंना म्हटलं होतं, सावलीत कार्यक्रम घ्या, उन्हात तुम्ही तापत आहात, तो ताप माझ्यावर निघाला तर अवघड व्हायचं.
Ajit Pawar, Sharad Pawar was left behind on the development of Baramati
महत्वाच्या बातम्या
-
मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
-
Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख
-
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा निर्णय, इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम न घेण्याचा ठराव
-
Rahul Gandhi : आता काेणी केली बाेलती बंद, वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना राहुल गांधींचे मौनव्रत