विशेष प्रतिनिधी
नागपूर : Devendra Fadnavis भारतीय जनता पार्टी व कम्युनिस्ट पार्टी सोडली तर देशातील सर्व 2300 पक्ष हे खाजगी मालकीचे आहेत. भाजप पक्षाची मालकी ही केवळ जनतेची आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.Devendra Fadnavis
भाजपकडून सदस्य नोंदणी महाभियान राज्यभर राबवले जात आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपुरात झाला. यावेळी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या सदस्य अभियानात मी माझा पण हातभार लावला आहे. मी पण 25 सदस्य केले आहेत.
अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले असतांना जगातील सर्वात मोठा पक्ष तयार करण्याचे आपण लक्ष्य ठेवले होत. तेव्हा 18 कोटी सदस्य केलेले होते. आता तो आकडा पार करायचा आहे. महाराष्ट्रत दीड कोटी सदस्य करण्याचे आमचे लक्ष्य आहे.
आपल्याला पक्ष म्हणून व सत्ता म्हणून आपली लोकाभिमुखता टिकवून ठेवायची असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सदस्य नोंदणी महाअभियानाच्या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना संदेश दिला.
ते म्हणाले, राज्यभरात हा सदस्य नोंदणी अभियान प्रत्येक बूथ पातळीवर राबवणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सदस्य अभियान महत्त्वाचं मानलं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा यश मिळवण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबवल जात आहे.
लोकांच्या मनातील पक्ष हा भाजपच आहे हे पुन्हा दाखवून दिले आहे. आज संध्याकाळ पर्यंत एक लाख सदस्य होतील. संघटना आणि जनते मुळेच सत्ता मिळाली आहे. आता लोकाभिमुखता टिकवून ठेवायची आहे.
All 2300 parties except BJP, Communists are privately owned, asserts Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली