विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Amit Shah वक्फने कुठे-कुठल्या जमीनी, मंदिरांवर दावे सांगितले, वक्फकडील जमिनींचं काय केले? यांची खडान्-खडान माहिती देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधकांवर तुटून पडले. लाेकसभेत अमित शहा यांनी काॅंग्रेसच्या करणीचा हिशाेबच मांडला. काॅंग्रेसने वक्फ बाेर्डाबाबत केलेल्या पापांची कुंडलीच मांडली.Amit Shah
अमित शहा म्हणाले, “2014 मध्ये लोकसभा निवडणुका होणार होत्या. 2013 मध्ये रातोरात वक्फ कायद्याला अमर्याद ताकद देण्यात आली. त्यामुळे दिल्लीतील 123 व्हीव्हीआयपी संपत्ती काँग्रेस सरकारने निवडणुकीपूर्वी वक्फला देण्याचे काम केले. दिल्लीत वक्फ बोर्डाने रेल्वेची जमीन स्वत:च्या नावावर केल्याची घोषणा केली. हिमाचलमध्ये वक्फची संपत्ती सांगून तिथे अवैध मशीद बांधण्यात आली. तामिळनाडूतील 250 हेक्टरवर असलेल्या गावावर वक्फने दावा सांगितला. तामिळनाडूतीलच एका 1500 वर्षे जुन्या असलेल्या मंदिराची 400 एकर जमीन वक्फची संपत्ती म्हणून घोषित केली. कर्नाटकातील एक रिपोर्ट आहे, त्यानुसार 29 हजार एकर जमीन व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली.”
“2001 ते 2012 दरम्यान वक्फची 2 लाख कोटींची संपत्ती खासगी संस्थानांना 100 वर्षांच्या करारावर देण्यात आली. बंगळुरूत उच्च न्यायालयाने 602 एकर जमीन जप्त करण्यापासून वक्फला रोखले. कर्नाटकातील विजयपूरमधील एका गावातील 1500 एकर जमिनीवर वक्फने दावा सांगून वादात टाकून दिले. 500 कोटींचे मूल्य असलेली जमीन फाइव्ह स्टार हॉटेलला महिना 12 हजार रूपयांच्या भाडेतत्त्वार दिली आहे. आणि हे म्हणतात, याचा हिशेब विचारू नका. हा पैसा देशातील गरीब मुस्लिमांचा आहे,” असे अमित शह यांनी ठणकावून सांगितले.
“कर्नाटकातील दत्तापीठ मंदिरावर वक्फने दावा केला. 50 वर्षांच्या अहवालाच्या आधारावर 600 एक जमिनीवर दावा सांगितला. ख्रिश्चन समाजाच्या अनेक जमिनींवर सुद्धा वक्फने दावा केला आहे. देशातील अनेक चर्च आणि त्यांचा समूह वक्फ विधेयकाचे समर्थन करत आहेत. वक्फ विधेयकाला विरोध करून काहीजण मुस्लीम समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, याला काहीही फायदा होणार नाही, अखिलेशजी… चार वर्षात मुस्लीम समाजाला हा कायदा त्यांच्याच फायद्यासाठी होता, हे माहिती होईल,” असे अमित शहा यांनी म्हटले.
“तेलंगणात 66 हजार कोटींच्या 1700 एकर जमिनीवर वक्फने दावा केला. आसाममध्ये मोरी गावातील 134 एकर जमिनीवर दावा, गुरूद्वारा संबंधित 14 जमिनी वक्फला देण्यात आल्या. प्रयागराजमध्ये चंद्रशेखर आझाद पार्कला सुद्धा वक्फचे असल्याचे घोषित केले. महाराष्ट्रात वडांगे गावातील महादेवाच्या मंदिरावर दावा केला. बीडमध्ये कंकलेश्वर मंदिराची जमीन वक्फने जबरदस्तीने घेतली आहे,” असे अमित शहा यांनी सांगितले.
“वक्फ मुस्लिमांच्या दानातून ट्रस्ट झाली आहे. त्यात सरकार कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. वक्फकडे लाखो-करोडोंची जमीन आहे. त्यातून मिळकत फक्त 126 कोटी रूपयांची मिळते,” अशी माहिती अमित शहा यांनी दिली आहे.
Amit Shah presented the Waqf sins of Congress, attacked the opponents in Lok Sabha
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा