विशेष प्रतिनिधी
मुंबई : Amol Mitkari महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राजकीय चर्चा घडू लागल्या आहेत. यामध्येच आता अजित पवारांचे आमदार अमाेल मिटकरी यांनीही उडी घेतली आहे. ठाकरे कुटुंबाप्रमाणे तुतारी गटानेही एकत्र येण्याचा विचार केला नक्की विचार करू. मात्र, अजितदादा पवारांचे नेतृत्व त्यांना मानावे लागेल, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.Amol Mitkari
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाल्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार यांनी एक ट्विट केले हाेते. त्यात म्हटले हाेते की मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल, तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे. सर्वच कुटुंबांनी या शब्दावर त्यांनी हॅशटॅग लावत विशेष जोर दिला आहे. सोबतच या पोस्टमद्ये त्यांनी शरद पवार, अजित पवार यांनाही टॅग केले हाेते. त्यामुळे रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार यांना एकत्र येण्याचंच आवाहन केल्याचं म्हटले जात आहे.
अमाेल मिटकरी यांनी त्यालाच उत्तर दिले आहे. अजित दादांच्या छत्रछायेखाली, तुतारी गट असाच एकत्र येण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचाही भविष्यात नक्कीच विचार केला जाईल, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षला खुली ऑफरच दिली आहे. मिटकरी यांनी म्हटले आहे की, जर ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल, तर निश्चितच स्वागतार्ह आहे. काहीही म्हटले, तरी राज ठाकरे साहेबांचा पक्ष शिवसेना ठाकरे गटापेक्षा लहानच आहे आणि लहानांनी मोठ्याकडे जाणे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरूनच म्हणता येईल. काल यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच, तुतारी गटाच्या एका नवीन आमदाराने ट्विट केले होते आणि म्हटले होते की, ‘असे सर्व पक्ष एकत्र यायला हवेत.’ मी त्यांच्या या म्हणण्याचे स्वागत करतो. आदरणीय अजित दादांच्या छत्रछायेखाली, जर तुतारी गट असाच एकत्र येण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचाही भविष्यात नक्कीच विचार केला जाईल.
मिटकरी म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे पुरोगामी विचारांशी, शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्याशी राहिलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आणखी बळकट होण्याकरता, जर तुतारी गटाला असे वाटत असेल की आपण दादांच्या नेतृत्वात पुढची वाटचाल करावी, तर नक्कीच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा त्यासंदर्भात ठरवतील. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बेरजेचे समीकरण करणे, बेरजेचे राजकारण करणे, हे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटते. त्यामुळे निदान नाही कुणाकडून, पण राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने हा आदर्श घ्यायला हरकत नाही.
Amol Mitkari’s invitation to ‘Tutari’, but will consider it if ready to accept Ajit Pawars leadership
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत