विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड आणि मराठवाड्यातील गुंडगिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजनेची आयएएस तुकाराम मुंडे त्यांच्यासारखाच स्ट्रॉंग अधिकारी हवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया Anjali Damania यांनी केली आहे.
दमानिया म्हणाल्या, मराठवाड्याला आता कोणीतरी खूप स्ट्राँग अधिकारी देण्याची गरज आहे. कोणाचेही न ऐकणारा असा व्यक्ती हवा आहे. मला असं वाटतं मुंडे विरुद्ध मुंडे करण्याची आता मराठवाड्याला गरज आहे. तुकाराम मुंडे यांना विभागीय आयुक्त ( डिव्हिजनल कमिशनर) म्हणून शासनाने तिथे पाठवलं तर त्यांच्यासारखा स्ट्राँग ऑफिसर आणि स्ट्राँग व्यक्तिमत्वाची आता गरज आहे.
दमानिया म्हणाल्या, माझ्याकडे रोज इतकी प्रकरण येतायेत, इतके मेसेजेस येतात, इतके व्हिडिओज येतात की बघून बघून मला थकायला होतंय.रात्री झोप लागत नाहीये.. धनंजय मुंडे आणि विरोधात कृषी घोटाळ्याची मालिकाच आहे. त्यांचे ऑफिस ऑफ प्रॉफिट काढलं होतं. कृषी घोटाळा काढला होता. सामाजिक न्याय मंत्री असतानाचे त्यांचे व्हिडिओज बाहेर येत आहेत,
बीडमधील राजकारण्यांवर आरोप करताना दमानिया म्हणाल्या, त्यांच्याकडे दहशत करणारे लोक आहेत. प्रत्येकाचे आपापले कार्यकर्ते आहेत. प्रत्येकाच्या आपल्या टोळी आहे. कुठून किती निधी आणायचा, त्यातील टक्केवारी यावर या टोळ्या काम करतात. यामुळे प्रशासकीय यंत्रणेत डॅशिंग ऑफिसर आणायला हवेत.
बीड पोलिसांवर टीका करताना त्या म्हणाल्या, सतीश भोसले हा फरार आहे. तो माध्यमांना मिळतो पण तो पोलिसांना मिळत नाही. पोलीस अधिक्षकांनी चॅनलवर कारवाई करण्यापेक्षा पोलिसांवर कारवाई करावी. आमदार प्रकाश सोळंके यांच्या कथित कार्यकर्त्याने मारहाण केल्याप्रकरणात त्यांनी उत्तर द्यावे.
Anjali Damania says a strong officer like Tukaram Munde is needed to break the cycle of hooliganism in Marathwada
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श