विशेष प्रतिनिधी
बीड : बीड जिल्ह्यातील सगळ्याच पक्षांचे नेते अडचणीत येऊ लागले आहेत. गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादीचे एक नेते अमरसिंह पंडित आता अडचणीत आले आहेत.Amarsingh Pandit
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांचा साडू दादा खिंडकर याचा एका तरुणाला मारहाण करतंच व्हिडीओ समोर आला आहे. खिंडकर हा राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांच्या जीवावर दादागिरी करतो असा आरोप ठाकरे गटाचे बीड जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी केला आहे. Amarsingh Pandit
दादा खिंडकरचे आका राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते अमरसिंह पंडित आहेत. त्यांनी चार गुन्हे दाखल करू दिले नाहीत, असा आरोप करून सातपुते म्हणाले, माझ्या घरावर दादा खिंडकर यांनी हल्ला केला. घराच्या दाराच्या कड्या लावल्या म्हणून वाचलो होतो.
आरोपीला अटक केली नाही म्हणून त्याची मुजोरी वाढली. दादा खिंडकर याने ग्रामपंचायतीत बोगस कामे करुन पैसे कमावले. दादा खिंडकर याच्यावर मोका लावला जावा, अशी मागणी देखील परमेश्र्वर सातपुते यांनी केली आहे.
दादा खिंडकर याची गावात खूप मोठी दहशत आहे. दादा खिंडकर टोळी चालवतो. बेलवाडी गावात मतदानाचा अधिकार नाही. स्वतः बटण दाबतात आणि फ्कत बोटाला सही लावली जाते. नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली जाते. खिंडकर याचा तडीपाडीचा प्रस्ताव त्यांनीच रोखला.
अमरसिंह पंडित आणि धनंजय मुंडे यांनी सपोर्ट केला नसता तर दादा खिंडकर जेल मध्ये असता. दादा खिंडकर याला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला नेत्याने कॉल केले होते, असा आरोप देखील परमेश्र्वर सातपुते यांनी केला आहे. असा आरोप परमेश्र्वर सातपुते यांनी केला आहे.