विशेष प्रतिनिधी
मुंबई : सरकारला लगाम घालण्यासाठी विराेधी पक्षनेत्याची नेमणूक करा, अशी मागणी काॅंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडेच केली. संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक व्हावी. अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने ही नियुक्ती लवकर करण्यात यावी, असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार Vijay Vadettiwar यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा कामकाज कार्यपद्धतीवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा मांडला. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधक ही विकासाची दोन चाके आहेत. यावर विरोधकांचे चाक म्हणजे विरोधी पक्षनेता आहे. हे चाक सध्या सभागृहात नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी असे वडेट्टीवार म्हणाले. Vijay Vadettiwar
महाराष्ट्रात संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेत्याची नेमणूक होते अशी परंपरा नाही, असे आम्ही पाहिले नाही. त्यामुळे नवीन परंपरा पाडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाले आहे, त्यांना लगाम घालायला आणि महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची गरज आहे.
विधानसभेचे कामकाज एकतर्फी होऊ नये. अधिवेशनाचे अंतिम आठवड्याचे काम ती खुर्ची रिकामी ठेवून कामकाज होऊ नये. अध्यक्षांना अधिकार आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा असा मुद्दा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडला. विधानसभेचे अध्यक्ष यांनी यावेळी सभागृहातील कामकाज हे नियमानुसार चालणार तसेच नियमानुसार नियुक्त्या करण्यात येतील असे आश्वासन दिले.
Appoint an opposition leader to rein in the government, Vijay Vadettiwar demands from the government itself
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप