विशेष प्रतिनिधी
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार कोणावरही बलात्काराचा आरोप असेल तर सर्वात पहिले त्याच्याविरोधात केस रजिस्टर करावी लागते. त्या नियमानुसार, केस दाखल करून आदित्य ठाकरेंना अटक करावी. ज्यांची नवे या प्रकरणात असतील त्यांची चौकशी करावी. जो न्याय अन्य लोकांना लागतो, तोच न्याय आदित्य ठाकरेंना लावावा अशी मागणी मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
दिशा सालियनच्या वडिलांनी सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केल्याचा आरोप मुंबई हायकोर्टात केलेल्या याचिकेतून केला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही या याचिकेत आरोप करण्यात आले होते.
यावर नितेश राणे म्हणाले, ही फार सरळ, सोपी केस आहे. दिशाची आत्महत्येची केस होती तर 8 जूनपासून ते आत्तापर्यंत पळापळी का चालली आहे, लपवालपवी का चालली आहे ? आदित्या ठाकरेंना यातून वाचवावं का लागतंय ? त्यांची जर काहीच इन्व्हॉल्व्हमेंट नसेल तर त्यांची मग एवढी पळापळ का सुरू आहे ?
आदित्य ठाकरे असतील, सूरज पंचोली असेल किंवा दिनो मोरिया असेल त्यांची चौकशी करावी, त्यांचा या केसमध्ये काहीच हात नसेल तर चौकशीमध्ये दूध का दूध पानी का पानी का पानी होईल, आम्हा सर्वांची थोबाडं बंद होऊन जातील, असे राणे म्हणाले. ही आत्महत्याच होती, या केसमध्ये काहीच नाहीये माझा हात, मला गोवण्यात येत आहे, असा विश्वास जर आदित्य ठाकरेंना असेल तर फार सरळ सोप आहे. त्यांनी चौकशीला सामोरं जावं, खरं काय ते सांगावं, पुरावे द्यावेत आणि आम्हाला सर्वांना खोटं ठरवावं असे आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.
संजय राऊत यांच्या आताच हे प्रकरण का काढले या आरोपावर उत्तर देताना राणे म्हणाले, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांचे नाव केसमध्ये आलं होतं. त्यांनी किती मोठं प्रेशर टाकलं होतं, हे तुम्ही दिशा सालियानच्या वडिलांकडून ऐकावं. काहीही न बोलण्यासाठी, आमच्यावर फार मोठा दबाव होता, असं त्यांनी स्वत: सांगितले होते. किशोरी पेडणेकर त्यांच्या घरी का गेल्या होत्या मग ? याप्रकरणात आता सर्व राजकारण्यांनी बाजूला व्हायला पाहिजे, एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, तिची हत्या झाली. आता तिला न्याय मिळाला पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे, एवढीच भूमिका आहे.
राणे म्हणाले, दिशा सालियानच्या वडिलांचं राजकारणाशी काही घेणंदेणं नाही, त्यांनी एक भूमिका मांडली, ते कोर्टात गेले. अनेक लोकं या केसचा फॉलोअप घेत आहेत. कोर्टात तारखा पडत आहेत. आणि आता दिशा सालियानच्या वडिलांचा विश्वास बसला आहे की माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही, त्याच्यात काहीतरी गडबड आहे, तिची हत्या झाली असं त्यांना वाटतंय. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे.
Arrest and interrogate Aditya Thackeray, Nitesh Rane demands
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार