विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात ४५ वर्षापूर्वी विश्वासघातकी संस्कृतीचे जनक कोण होते? हे सत्यही एकदा समोर आणा. त्यामुळे जे स्वतः महाराष्ट्रातून हद्दपार झाले त्यांनी तडीपारीची भाषा करू नये, असा पलटवार माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाले, भाजप पक्ष, पक्षनेतृत्व, सरकार आणि अमितभाई शाह यांच्यावरची वक्तव्ये बघता शरद पवार साहेबांचा तोल जाऊ लागल्याचे लक्षात येते. अमितभाईंचे भाषण आणि भाजपचे अधिवेशन त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते. तडीपारीची भाषा आणि वक्तव्यांमुळे तुम्हाला, तुमच्या पक्षाला, मित्रपक्षाला आणि आघाडीला महाराष्ट्राने हद्दपार केले आहे.
त्याचे तुम्ही चिंतन करा. ज्या अमितभाईंना न्यायालयात निर्दोषत्व मिळाले त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या प्रकरणाबद्दल वारंवार उल्लेख करणे हे न्यायिक प्रक्रियेला धरून नाही. लवासाच्या बाबतीत कोर्टाने केलेले निर्देश, उपस्थित केलेल्या शंका आणि त्याभोवतीचे वलय हे बघता चार बोटं कुणाकडे येतात ते लक्षात ठेवा. महाराष्ट्राने असाही नेता बघितला नव्हता हे म्हणण्याची आमच्यावर वेळ आणू नका.”
शरद पवार साहेब आपण तोल गेल्यासारखे वागून अशी वक्तव्ये करू नयेत. न्यायिक प्रक्रियेत ज्या अमितभाईंना निर्दोषत्व मिळाले त्यांच्या बाबतीत विधान करणार असाल तर लवासापासून बऱ्याच न्यायिक प्रक्रियेत इंगित संदेश कोणाकडे जातो हे बोलण्याची वेळ तुम्ही आणू नका. खंजीर खुपसण्याच्या ४५ वर्षांपूर्वी राजकारणासाठी आणि सत्तेसाठी वाट्टेल ते याचे जनक कोण त्याचेही उत्तर द्या. जनसंघ आणि भाजपासोबत तुम्ही सरकार बनवले. सत्तेसाठी तुम्हाला काहीही लागत नाही हेदेखील महाराष्ट्राला सांगा,” असेही आशिष शेलार म्हणाले.
भाजपचे अधिवेशन आणि अमितभाईंचे भाषण शरद पवारांच्या जिव्हारी लागले आहे, भाजप पक्ष, पक्षनेतृत्व, सरकार आणि अमितभाई शाह यांच्यावरची वक्तव्ये बघता शरद पवार साहेबांचा तोल जाऊ लागल्याचे लक्षात येते. अमितभाईंचे भाषण आणि भाजपचे अधिवेशन त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते. तडीपारीची भाषा आणि वक्तव्यांमुळे तुम्हाला, तुमच्या पक्षाला, मित्रपक्षाला आणि आघाडीला महाराष्ट्राने हद्दपार केले आहे. त्याचे तुम्ही चिंतन करा.
ज्या अमितभाईंना न्यायालयात निर्दोषत्व मिळाले त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या प्रकरणाबद्दल वारंवार उल्लेख करणे हे न्यायिक प्रक्रियेला धरून नाही. लवासाच्या बाबतीत कोर्टाने केलेले निर्देश, उपस्थित केलेल्या शंका आणि त्याभोवतीचे वलय हे बघता चार बोटं कुणाकडे येतात ते लक्षात ठेवा. महाराष्ट्राने असाही नेता बघितला नव्हता हे म्हणण्याची आमच्यावर वेळ आणू नका.
Ashish Shelar’s counterattack on Sharad Pawar
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती