विशेष प्रतिनिधी
दापोली : पहलगाम हल्ल्यावर देशात संताप व्यक्त होत आहे. धार्मिक आधारावर फूट पडू नये अशी आवाहने केली जात असताना भाजपचे मंत्री नितेश राणेंच्या (Nitesh Rane) वादग्रस्त वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. हिंदुंनी कुठल्याही दुकानदाराकडून कुठलीही वस्तू विकत घेण्याआधी त्याचा धर्म विचारला पाहिजे. दुकानदाराला हनुमान चालिसा येत नसेल, तर त्याच्याकडून सामान विकत घेऊ नका, असे त्यांनी म्हटले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीते एका सभेत बोलताना पहलगाम हल्ल्यावर संताप व्यक्त करताना राणे म्हणाले, “त्यांनी मारण्याआधी आपला धर्म विचारला. म्हणून हिंदुंनी सुद्धा काही विकत घेण्याआधी त्यांचा धर्म विचारला पाहिजे. ते तुम्हाला तुमचा धर्म विचारुन मारत असतील, तर तुम्ही सुद्धा सामान खरेदी करण्याआधी त्यांचा धर्म विचारला पाहिजे. हिंदू संघटनांनी सुद्धा अशी मागणी केली पाहिजे.
असही होईल की, काही दुकानदार त्यांचा धर्म सांगणार नाहीत, त्यांच्या श्रद्धेबद्दल खोटं सांगतील असे सांगून नितेश राणे म्हणाले. “जेव्हा तुम्ही खरेदीसाठी जाल, तेव्हा त्यांना त्यांचा धर्म विचारा. त्यांनी सांगितलं की, ते हिंदू आहेत, तर त्यांना हनूमान चालिसा म्हणायला लावा. त्यांना हनुमान चालीसा येत नसेल, तर त्यांच्याकडून काही विकत घेऊ नका.
‘ पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळी मारण्याआधी त्यांचं नाव आणि धर्म विचारला. प्रत्यक्षदर्शींनी हे सुद्धा सांगितलं की, हल्लेखोरांनी काही पर्यटकांना कलमा म्हणायला लावला. जे असं करु शकले नाहीत, त्यांची गोळी मारुन हत्या केली, असा संदर्भ राणे यांनी दिला.
Ask the shopkeeper about his religion before buying, make him recite Hanuman Chalisa, Nitesh Rane’s controversial statement
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला