Baba Siddiqui : बाबा सिद्दीकींचे मारेकरी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचाही करणार होते खून

Baba Siddiqui : बाबा सिद्दीकींचे मारेकरी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचाही करणार होते खून

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Baba Siddiqui राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना पुण्यातल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचाही खून करणार होते. त्यांनी प्लानिंगही केलं होतं. पण त्याआधीच बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात त्यांना अटक झाल्याने हा कट फसला, असा धक्कादायक खुलासा आता झाला आहे.Baba Siddiqui

मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी मक्को कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या तिन्ही आरोपींनी फरार आरोपी शुभम लोणकरच्या नेतृत्वात आरोपी रुपेश मोहोळ आणि गौरव अपूने यांनी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येचं प्लानिंग केलं होतं.



 

सप्टेंबर महिन्यात पुण्याच्या उत्तम नगर परिसरात गुंड जयदीप भोंडकरची अमित गुर्जरने हत्या केली होती. भोंडकरची हत्या करणाऱ्या आरोपी अमित गुर्जरला या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने पूर्ण मदत केल्याचा संशय शुभम लोणकरच्या गँगला होता. हत्या झालेला जयदीप भोंडकर हा शुभम लोणकर आणि त्याच्या सहकाऱ्यांचा जवळचा मित्र होता. शुभम लोणकर हा लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी काम करतो. या तीन आरोपींनी जयदीप भोंडकरच्या हत्येचा बदला म्हणून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येचा कट रचला पण त्याआधीच त्यांना सिद्दिकी हत्या प्रकरणात अटक झाली.

गुन्हे शाखेने ही माहिती उत्तम नगर पोलिसांना दिली. जेणेकरुन अधिकाऱ्याच्या मुलाला पुरेशी सुरक्षा मिळेल. जयदीप भोंडकरची 7 सप्टेंबरला अमित गुर्जरने कोयत्याने वार करुन हत्या केली होती. दोघे एकमेकांना ओळखायचे. दोघांमध्ये आधी बोलणं सुरु झालं. ते वादावादीमध्ये बदललं आणि त्यानंतर दोघे हिंसक बनले. गुर्जरने मदत हवी म्हणून भोंडकरला त्याच्या घराबाहेर बोलावलं. त्याचवेळी त्याने कोयत्याने वार करुन हत्या केली.

रुपेश मोहोळ आणि गौरव अपूला खात्री होती की, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने अमित गुर्जरला फक्त मदतच केली नाही, तर हा सगळा कट रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रुपेश मोहोळ आणि गौरव अपूने चौकशीत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. शुभमच्या मदतीने हल्ला करण्यासाठी त्यांनी शस्त्र मिळवलं होतं.

Baba Siddiqui’s killers were also going to kill the son of a retired police officer

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023