छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला असून १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.
विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar येथील सिटी चौक पोलीस स्टेशन येथे मंगळवार, ८ एप्रिल रोजी एफआयआर क्र. १५० दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यासंबंधी केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने कार्यालयीन संचिकाची छाननी करुन तपासणी करत असताना काही लोकांनी जन्म-मृत्यू नोंदणी आदेश मिळण्यासाठी कार्यालयास चुकीची, बनावट कागदपत्रे सादर केल्याचे दिसून आलेले आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार केलीChhatrapati Sambhajinagar
यावेळी मोहम्मद जमील सिद्दिकी मोहम्मद रशीद, मुजफ्फर अन्वर खान, नबी हबीब शेख, युनुस रफीक शेख (मुलगी इशरत युनुस शेख), युनुस रफीक शेख (मुलगा जुनेद युनुस शेख), युनुस रफीक शेख (मुलगा जैद युनुस शेख), रिजवान खान अनवर खान पठाण, सादिक हुसेन शेख, शाहेद सज्जाद शेख,मिर्झा अनवर बेग या दहा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
महाराष्ट्रात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणलं असून मागील 6 महिन्यात 2 लाख 14 हजार बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचे अर्ज देऊन बोगस कागदपत्र दिले, असा दावा भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला हाेता. 2 लाख 14 हजार अर्जांपैकी 1 लाख 13 हजार लोकांना जन्म प्रमाणपत्र मिळाले असल्याचं ही सोमय्या यांनी म्हटले हाेते.
भारतातून बांगलादेशी घुसखोरांना तातडीने हाकलून काढा, अशी मागणी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने करून सरकारकडे ही मागणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात आणि राज्यांमध्ये बांगलादेशी यांची घुसखोरी झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चुकीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे त्वरित अशा घुसखोरांना देशाबाहेर हाकला अशी मागणी करण्यात आली आहे.
Bangladeshi birth certificate scam exposed in Chhatrapati Sambhajinagar
महत्वाच्या बातम्या
- 10th-12th board दहावी- बारावी बाेर्डाची वेबसाईट हाेणार सायबर सुरक्षित, निकालाच्या दिवशी येणार नाही ताण
- Kedar Jadhav : माजी क्रिकेटपटू केदार जाधवची राजकारणात नवी इनिंग
- Phule Movie : चित्रपटामुळे पुन्हा जातीय वाद वाढू शकतो, ‘फुले’ चित्रपटावर ब्राह्मण महासंघाच्या नेत्याचा आक्षेप
- Sandeep Deshpande : भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचं का, मनसेच्या इशाऱ्याने परप्रांतीय वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे