विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ चक्क बांग्लादेशीनी घेतला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. योजनेत १८१ लाभार्थी बांग्लादेशी असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर माहिती देत बोगस लाभार्थ्यांची यादी पोस्ट केली आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील भादवण गावात ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी’ योजनेमध्ये १८१ बोगस बांगलादेशी लाभार्थी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आत्ता बांगलादेशी लाभार्थी!?
उद्या 7 मार्च कळवण आणि नाशिक दौरा
सकाळी 12 वाजता कळवण आणि 4 वाजता नाशिक@BJP4Maharashtra pic.twitter.com/p8fJZOBl9S
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 6, 2025
भादवण येथे १८१ बोगस पीएम किसान योजनेचे लाभार्थी निदर्शनास आले असून सगळे लाभार्थी मुस्लीम समाजाचे आहेत. भादवण गावात आजपर्यंत एकही मुस्लीम कुटुंब अस्तित्वात नाही.
भादवण गावाचा आणि यादीतील १८१ लाभार्थ्यांचा काहीही संबंध नाही. तरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजाचे बोगस पीएम किसान योजेनेचे लाभार्थी कसे काय लाभ घेत आहेत? याची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Bangladeshis took benifit of the Prime Minister Kisan Samman Nidhi Yojana, Kirit Somaiya gave evidence
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल