विशेष प्रतिनिधी
बीड : बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याने परळी विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम आणि मतमोजणी प्रक्रियेबाबत सोशल मीडियावर केलेले आरोप खोटे, निराधार आणि सनसनाटी निर्माण करणारे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी परळीचे तहसीलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून कासले याच्याविरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ranjit Kasle
पोलिसांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीदरम्यान कासले याची परळी मतदारसंघात कोणतीही ड्युटी नव्हती. ईव्हीएम मशीन आणि मतमोजणी प्रक्रिया केंद्रीय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या निगराणीखाली सीसीटीव्ही अंतर्गत पार पडली होती. निवडणूक निरीक्षक आणि सर्वपक्षीय प्रतिनिधीही या प्रक्रियेला साक्षीदार होते.
तथापि, कासले याने समाजमाध्यमांवर व्हिडिओ शेअर करत, स्वतःला ड्युटीवर असल्याचा खोटा दावा केला. त्यात त्याने १० लाख रुपये देऊन गप्प बसवण्यात आल्याचा आरोप करत निवडणूक आयोग, लोकप्रतिनिधी आणि सरकारवर शंका निर्माण केली होती. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, असे तक्रारीत नमूद आहे.
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
याप्रकरणी कासले याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 175, 336(4), 353(1-ब), 198, 356(2) आणि 197(1-ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास परळी शहर पोलीस करत आहेत.
दरम्यान, बीड जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, कासले याची नियुक्ती बीडच्या सायबर विभागात होती आणि परळी मतदारसंघाशी त्याचा काहीही संबंध नव्हता.
तसेच, कासले याने 10 लाख रुपये मिळाल्याचा जो दावा केला आहे, त्या रकमेपैकी साडे सात लाख रुपये अंबाजोगाईतील संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे संचालक सुदर्शन काळे यांच्याकडून घेतल्याचे व त्यापैकी काही रक्कम परत केल्याचेही समोर आले आहे. उर्वरित रक्कम परत मिळावी म्हणून काळे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर कासले याचे आरोप केवळ प्रसिद्धीसाठी आणि गोंधळ निर्माण करण्याच्या हेतूने केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Baseless Allegations on EVMs: Case Filed Against Dismissed Police Sub-Inspector Ranjit Kasle
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
- Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव
- Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका
- MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना