विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘सामना’मधील अलीकडचे अग्रलेख असे लिहिले जात आहेत की उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न संजय राऊत करत असल्याची शंका आता खुद्द उद्धव ठाकरेंच्या जवळच्या लोकांनीच व्यक्त केली असा धक्कादायक गौप्यस्फोट महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. Saamana
संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात “फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस” असा संघर्ष दाखवत भाजपवर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “अकलेचा कांदा म्हणजे कोण, हे महाराष्ट्राला चांगलंच ठाऊक आहे. स्वतःला दररोज उठल्यावर महान, विचारवंत समजणारे लोक कोण आहेत हे महाराष्ट्र ओळखतो.”
“आजही त्यांनी महाराष्ट्रात भांडण लावण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. सत्ता गेल्यानंतर काही लोक किती असहाय्य आणि बरळणारे होतात, याचे जिवंत उदाहरण आपण पाहतोय. फुले चित्रपटावरून त्यांना मानसिक असंतुलन आल्यासारखे वाटते. त्यांनी फडणवीसांवर बिनबुडाचे आरोप करत गरळ ओकली,” असा आरोप त्यांनी केला.
बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की, “फडणवीस सरकारने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस विधिमंडळ ठरावाद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मात्र त्यांनी असा विचारही केला नाही. आता त्यांचेच सहकारी ‘फुले विरुद्ध फडणवीस’ असं हास्यास्पद चित्र मांडत आहेत.”
“कधी काळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, हे सुद्धा विसरून जावं असं त्यांचं सध्याचं वर्तन आहे,” असं म्हणत बावनकुळे यांनी टोला लगावला. “जनतेने निवडणुकीत खोटारड्यांना साफ नाकारलं, तरी अजूनही त्यांना अक्कल आलेली नाही. नव्या महाभारतात झोपेचे सोंग घेणारा संजय राऊत काहीच उपयोगाचा राहिलेला नाही. सर्वकाही संपल्यानंतर शहाणपण येईल, पण तेव्हा उशीर झालेला असेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
Bawankule attacks Sanjay Raut for trying to eliminate Uddhav Thackeray by writing such an editorial in Saamana
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला
- लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती
- चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका