विशेष प्रतिनिधी
Nagpur News: औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा अनावश्यकपणे उकरून काढला जात आहे. ज्यांची श्रद्धा असेल ते लोक औरंगजेबाच्या कबरीवर जातील, असे स्पष्ट विधान करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. कबर भारताच्या उदारतेचं, सर्वसमावेशकतेचं प्रतीक असल्याचेही ते म्हणाले.
गेल्या महिन्याभरापासून औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, अशी मागणी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात भूमिका मांडली होती. “संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नाही. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही”, असं म्हटलं होतं.
औरंगजेबाची कबर हा मुद्दा थेट विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातदेखील आला. यावरून राजकीय पक्ष आक्रमक झाले असताना संघाकडून पुन्हा एकदा याबाबत भाष्य करण्यात आलं आहे.
भैय्याजी जोशी म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यकपणे चर्चिला जात आहे. औरंगजेबाचा मृत्यू इथे झाला तर त्याची कबर इथेच असणार. काही लोकांची श्रद्धा असेल तर ते तिथे जातील. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. त्यांनी तर अफजलखानाचीही कबर किल्ल्यावर बनवली आहे. हे भारताच्या उदारतेचं, सर्वसमावेशकतेचं प्रतीक आहे.
Bhaiyyaji Joshi said, controversy is unnecessary, those who have faith will go to Aurangzeb’s grave
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला