विशेष प्रतिनिधी
नाशिक : नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे भुजबळ समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व मित्र पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
राज्यात ठिकठिकाणी भुजबळ समर्थकांनी आंदोलन केले. येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील विंचूर येथे छत्रपती संभाजीनगर-नाशिक राज्य मार्गावर अर्धा तासच्या जवळपास रस्ता रोको आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी वाहतूक कोंडी होत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नाशिक मध्ये एकवटले. छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळण्यासाठी घोषणाबाजी केली. नाशिकच्या विकासासाठी छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळावे यासंदर्भात आम्ही अजित पवारांकडे निवेदन देणार असे आंदोलकांनी सांगितले.
-छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळण्यासाठी आम्ही अजित पवारांना निवेदन देण्यासाठी एकत्र आल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.
Bhujbal supporters protested at various places
महत्वाच्या बातम्या
- Raju Shetty साखरेचे दर कोसळल्याचा शेतकरी व ग्राहकांनाही फटका, राजू शेट्टी यांची चौकशीची मागणी
- Sanjay Raut’ : संजय राऊतांचा ‘नैराश्येतून एकला चलोचा नारा , विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
- Vijaya Rahatkar : काही महिलांकडून कायद्याचा गैरवापर, पण त्यामुळे महिला संरक्षण कायद्यांवर प्रश्नचिन्ह लावणे अयोग्य!!
- D Gukesh : बुद्धिबळाचा नवा राजा…ठरला भारताचा डी गुकेश! विजयानंतर अश्रू अनावर झाले