विशेष प्रतिनिधी
नागपूर : नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड असलेल्या फहीम खानच्या घरावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने बुलडोझर चालविला आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
सोमवारी महाल, हंसापुरीत झालेल्या दंगल व जाळपोळीच्या घटनेचा फहीम खान हा सूत्रधार होता. यशोधरानगर येथील संजयबाग कॉलनीतील घरात त्याने अनधिकृत बांधकाम केले होते. त्याला मनपा प्रशासनाने त्याला नोटीस बजावली होती. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात फहीमच्या घरावर बुलडोझर चालविण्यात आला व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.
सोमवारी महाल, हंसापुरी परिसरात झालेल्या जाळपोळ व दगडफेकीच्या घटनेनंतर मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी शहराध्यक्ष फहीम खान शमीम खानला अटक करण्यात आली होती. औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मुद्द्यावरून रविवारी सकाळच्या सुमारास महालच्या शिवाजी पुतळा परिसरात आंदोलन झाले होते. या आंदोलनानंतर फहीम खानने षडयंत्र रचून जमावाच्या भावना भडकाविल्या व त्यातून जाळपोळ सुरू झाल्याचा त्याच्यावर ठपका आहे. त्याच्याविरोधात देशद्रोहाचादेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजयबाग कॉलनीत त्याने घरात दोन मजल्यांवर ९०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम केले होते. २१ मार्च रोजी मनपाने त्याच्या घरी नोटीस पोहोचवली. हे अतिक्रमण तातडीने पाडण्याची कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून आले होते. सोमवारी सकाळीच मनपाचे पथक तेथे पोहोचले व कारवाईला सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तदेखील तैनात होता.
उत्तर प्रदेशप्रमाणे नागपुरातदेखील दंगेखोरांच्या घरावर बुलडोझर चालणार का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला होता. त्यावर ‘दंगेखोरांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. वेळ पडली तर त्यांच्या घरावर बुलडोझर चालविण्यात येईल,’ अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर महापालिकेने लगेच फहीम खानच्या कुटुंबीयांना अतिक्रमणबाबत नोटीस दिली व कारवाई देखील केली.
Bulldozer hits house of Nagpur riots mastermind Faheem Khan
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप