विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : Narayan Rane माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या काेंबडीचाेरापासून ते काेंबडीवाल्यापर्यंत आराेप केले जातात. याला नारायण राणे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. भ्रष्टाचार करण्यापेक्षा व्यवसाय केलेला बरा. मी 1982 सालापासून मुंबईत चिकनचा व्यवसाय करतोय. हा व्यवसाय आता भाऊ करतो. आम्ही फक्त गल्ल्यावर बसतो. कापणारे वेगळे असतात. काही लोक कोंबडीवाला म्हणून आमचा उल्लेख करतात, असे नारायण राणे यांनी सांगितलं.Narayan Rane
रत्नागिरी येथे पत्रकारांशी बाेलताना राणे म्हणाले, भ्रष्टाचार करण्यापेक्षा कोणताही व्यवसाय केलेला बरा. करोना महासाथीच्या काळात औषधावर 15 टक्के पैसे खाण्यापेक्षा हा व्यवसाय बरा आहे. कोण पैसे खातायत हे तुम्हाला माहिती आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर बाेलताना ते म्हणाले, दोन भाऊ आम्हाला एकत्र नको आहेत का? त्यांनी एकत्र यावं. पण राजकारणातून संपलेल्या व्यक्तींनी एकत्र येण्याने काय होणार आहे. आज त्यांच्याकडे काय आहे? उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 20 आमदार आहेत. पुढच्यावेळी पाचही आमदार नसतील. राज ठाकरे यांच्याकडे तर काहीही नाहीत.
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक हे शिंदे यांच्या शिवसेनेत येण्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे. शिंदेच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत हे सकारात्मक असल्याचं बोललं जातंय. नारायण राणे यांनी मात्र यावर संताप व्यक्त केला आहे. “उदय सामंत हे माझे सल्लागार नाहीत. हे माझं उत्तर आहे. मी परवानगी दिल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वैभव नाईक मला घ्या म्हणत बाहेर बसलेले असायचे. समोरून ते निष्ठावान शिवसैनिक असा बोर्ड लावतात. मला राजकारणात 59 वर्षे झालीत. वैभव नाईक हे माझ्याबद्दल काहीही बोलतात. त्यांची माझ्याबद्दल बोलण्याची लायकी नाही. मी त्यांच्याबद्दल अजूनही वाईट विचार केलेला नाही.
Business is better than corruption, Narayan Rane’s reply on the allegation of chicken
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती