Abdul Sattar : दानवे, शिरसाठ यांना आव्हान देत अब्दुल सत्तार म्हणाले मी पुन्हा येईन!

Abdul Sattar : दानवे, शिरसाठ यांना आव्हान देत अब्दुल सत्तार म्हणाले मी पुन्हा येईन!

Abdul Sattar

विशेष प्रतिनिधी

सिल्लोड: Abdul Sattar काही लोक म्हणतात मी सिल्लोडला येतो. तुम्ही काय येता अरे मीच छत्रपती संभाजीनगरला येतो. इथे कुणाची गुंडगिरी किती आहे? त्याला कसं थांबायचं? याचाही निर्णय मीच घेणार आणि मी येणार. तुमचं सिल्लोडला येणं एवढं सोपं नाही असा इशारा देत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मी पुन्हा येईन असा विश्वास व्यक्त केला.Abdul Sattar

सिल्लोड येथे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सत्तार बोलत होते. ते म्हणाले, माझा ६१ वा जन्मदिवस एवढ्या मोठ्या उत्साहात साजरा होईल असा विचार केला नव्हता. मंत्री असताना अनेक सत्कार होतात. मात्र मंत्री नसतांना हा सत्कार होतोय.छत्रपती संभाजीनगर,वैजापूर, सोयगाव, कन्नड, पैठण यासह माराठवड्यातून येथील लोक आले आहेत.राजकारणात जे कमावलं ते समोर बसवले आहे. हीच माझी ताकत आहे. सत्तेत असताना लोक येतात मात्र काही नसताना हजारो लोक आले.
विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, काही लोक पक्षाच्या, जातीच्या नावाने राजकारण करतात . मात्र मी मित्राच्या नावावर राजकारण करतो. मी सिल्लोड विधानसभेत चौकार मारला. मात्र आमच्या गावाला लोक बदनाम करतात.



सत्तार मंत्रीपद मिळाले नसल्याने नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर आपली भूमिका मांडताना ते म्हणाले, अनेक लोक विचार करतयेत की मी काय करणार. याबाबत तर्क लावत आहे. काही लोक म्हणाले सत्तार साहेब तुमचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. मात्र माझा निर्णय हाच आहे की एकनाथ शिंदे यांचा जोपर्यंत माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी त्यांचाच आहे. त्यांच्याच पक्षात राहणार. ज्या दिवशी त्यांचा विश्वास संपेल त्या दिवशी तुमच्या विश्वासाचे पालन करेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास माझ्यावर आहे. अजित पवारांचा देखील विश्वास माझ्यावर आहे. राजकारणात पद येतात आणि जातात.
विरोधकांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, काही लोकांना सिल्लोडची खूप आठवण येते. पहिली एकाला आली. ते रावसाहेब दानवे ते घरी बसले.

आता एकाला येत आहे. मला पाच वर्ष मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली पुढील अडीच वर्षात मंत्री मिळेल का नाही याचं सांगता येत नाही. आश्वासन दिलं जातं. मात्र आमच्या नेत्याने सांगितलं अडीच वर्षे शहरातील, अडीच वर्षे ते राहतील. तरी मी पुन्हा येईल. मात्र मी छत्रपती संभाजीनगरला येणार आहे.मी झिरो पासून राजकारणाची सुरुवात केली.

कुछ देर तक खामोशी है, फिर कानो मे शोर आयेगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा दौर आयेगा असा विश्वास व्यक्त करत सत्तार म्हणाले, काही लोक एखादा नाला जसा खडखड करतो तसं खडखड करत आहेत. आम्ही इथे बसलेले सगळे समुंदर आहे. आम्हाला हलवणं एखाद्या तात्पुरता बसवलेल्या व्यक्तींचं काम नाही. राजकारणात प्रत्येक व्यक्ती राजकारण करतो.

Challenging the Danve, Shirsath, Abdul Sattar said I will come again!

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023